जितो कनेक्ट परिषद आजपासून

By Admin | Published: April 8, 2016 01:05 AM2016-04-08T01:05:25+5:302016-04-08T01:05:25+5:30

जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन) च्या पुणे विभागद्वारे आयोजित ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे

JETO CONNECT CONGRESS | जितो कनेक्ट परिषद आजपासून

जितो कनेक्ट परिषद आजपासून

googlenewsNext

पुणे : जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन) च्या पुणे विभागद्वारे आयोजित ‘जितो- कनेक्ट २०१६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, प्रसिद्ध उद्योगपती अभय फिरोदिया यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे, अशी माहिती परिषदेचे आयोजक जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी आणि जितो महाराष्ट्र झोनचे प्रमुख राजेश साकला यांनी दिली.
गंगाधाम चौकात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १६ एकर परिसरात भव्य सभामंडप उभारण्यात आले आहेत. जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पीयूष गोयल, स्वामी रामदेव बाबा, डॉ. स्नेह देसाई, अरुणिमा सिन्हा, अमला रुईया, मालती जैन, मोतीलाल ओसवाल, डॉ. ए. वेलुमनी, सुहास गोपीनाथ, ग्रेग मॉरन, राहुल नार्वेकर, रुपल योगेंद्र यांच्यासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी व्यक्ती परिषदेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. देश-विदेशातून सुमारे ४ लाख उद्योजक-व्यापारी येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: JETO CONNECT CONGRESS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.