Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:27 PM2021-12-14T19:27:31+5:302021-12-14T19:27:59+5:30

सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या दुकानात जात असे

Jewelry stolen from Ranka Jewelers in Pune to give as a gift to girlfriend The future doctor arrest | Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड

Video: गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पुण्याच्या रांका ज्वेलर्समधून दागिन्यांची चोरी; भावी डॉक्टर गजाआड

Next

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स आणि ब्ल्यू स्टोन ज्वेलर्समधून सोन्याच्या अंगठ्या घेऊन पळून जाणाऱ्या दोन भावी डॉक्टरांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले. सोन्याच्या अंगठ्या विकत घेण्याच्या बहाण्याने ते सराफाच्या दुकानात जात असे. आणि अंगठी पाहण्याचा बहाणा करून अंगठी घेऊन पळून जात होता. आता पोलिसांनी सराफा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासून तांत्रिक विश्लेषण करत दोघा आरोपींना अटक केली आहे. अनिकेत हनुमंत रोकडे (वय 23) आणि वैभव संजय जगताप (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील रांका ज्वेलर्स 8 डिसेंबर रोजी दोन अनोळखी तरुणांनी अंगठा विकत घेण्याच्या बहाण्याने चोरी केली होती. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्याच दिवशी कोथरूड येथील ब्ल्यू स्टोन ज्वेलर्स मधून अशाच प्रकारे दोन तरुणांनी चोरी केल्याचे समोर आले होते. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

हडपसर पोलिसांनी सराफा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासून तांत्रिक विश्लेषण करत दोघा आरोपींना अटक केली.  हे दोघेही पुण्यातील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतात. एक जण बीएएमएस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या तृतीय वर्षाला आहेत. हे दोघेही व्यसनाधीन आहेत. व्यसन, चैन आणि मैत्रीणीला गिफ्ट देण्यासाठी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Jewelry stolen from Ranka Jewelers in Pune to give as a gift to girlfriend The future doctor arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.