जिग्नेश, उमरच्या कार्यक्रमाला हिंदू समितीचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:09 AM2017-12-28T04:09:06+5:302017-12-28T04:09:20+5:30
पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे.
पुणे : गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खलीद यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर होणा-या ‘एल्गार परिषदे’ला समस्त हिंदू समितीने विरोध केला आहे.
भीमा-कोरेगाव येथे झालेल्या पेशवे व इंग्रज यांच्यातील लढाईला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त तिथे शौर्य प्रेरणा दिन अभियान राबवण्यात येणार आहे. १६ जिल्ह्यांतील २५० संघटना त्यासाठी एकत्रित येत आहेत. त्या सर्वांची एल्गार परिषद ३१ डिसेंबरला शनिवार वाडा येथे आयोजित केली आहे. विशेष वक्ता म्हणून जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर, निवृत्त न्या. पी. बी. सावंत, बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह ‘जेएनयू’तील विद्यार्थी नेता उमर खालिद व रोहित वेमुलाची आई राधिका वेमुलाही सहभागी होणार आहेत.
मात्र समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी या कार्यक्रमाला विरोध करणारे निवेदन महापौरांना दिले आहे. हा कार्यक्रम राजकीय असल्याने त्यासाठी दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर महापालिका प्रशासनाकडून सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्याने अशा कारणांसाठी पटांगण घेतले आहे, असे संयोजकांचे म्हणणे आहे.