जेजुरीत चंद्रग्रहणामुळे भाविकांची गर्दी कमी

By admin | Published: April 4, 2015 11:09 PM2015-04-04T23:09:54+5:302015-04-04T23:09:54+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीत आज चैत्र पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कालपासून दिवसभरात लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले.

In Jiju, a decrease in the number of devotees due to lunar eclipse | जेजुरीत चंद्रग्रहणामुळे भाविकांची गर्दी कमी

जेजुरीत चंद्रग्रहणामुळे भाविकांची गर्दी कमी

Next

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आज चैत्र पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कालपासून दिवसभरात लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. मात्र,चंद्रग्रहणामुळे भाविकांच्या गर्दीवर मोठा परिणाम जाणवला.
महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने जेजुरीत चैत्र पौर्णिमेला मोठी गर्दी असते, कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रम उरकण्यासाठी अडीच-तीन लाखांवर भाविक दर वर्षी जेजुरीला येत असतात. या वर्षी ग्रहणाचा योग असल्याने गर्दीवर परिणाम जाणवला. काल शुक्रवारी दुपारी ३.१७ वा. पौर्णिमा सुरू झाली. आज सायंकाळी ५.३७ पर्यंतच तिचा पुण्यकाळ होता. यातच खग्रास चंद्रग्रहण सुरू झाल्याने भाविकांनी जेजुरीस देवदर्शनास येण्याचे टाळले. मात्र उद्यापासून भाविकांची गर्दी वाढेल असा पुजारी, सेवक, व्यापारी वगार्तून कयास व्यक्त केला जात आहे.
काल शुक्रवारपासून आज दिवसभरात लाखावर भाविकांनी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. वर्षाची कुलदैवताची वारी सफल केली. येथील ऐतिहासिक चिंचबाग, आनंदनगर परिसरात भाविकांची तुरळक गर्दी होती.
मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाने यात्रेचे नियोजन केले होते.
गडावर भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून दर्शनरांगांवर सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. भाविकांसाठी प्रथमच लाडू प्रसाद विक्रीची सोय करण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.
शहरात ज्या ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी होती तिथे पालिका प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली होती. चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश नाकारला असल्याने बाजार पटांगण, पालखी मैदान आदी ठिकाणी वाहनव्यवस्था करण्यात आली होती.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(वार्ताहर)

४जेजुरी कडेपठार मंदिरात भाविकांची गर्दी होती. भाविकांनी देवदर्शनाबरोबर कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रमही उरकले. राज्यभरातून अनेक ठिकाणावरून भाविकांनी आपआपल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक, आदी देवभेटीसाठी आणले होते.
४नाझरे जलाशयावर स्नान, कुलधर्म कुळाचार उरकून भाविक गडावर जाऊन देवदर्शन घेत होते. अनेकांनी आपआपल्या शिखरी काठ्या, उत्सवमूर्तींच्या पालख्याही देवभेटीसाठी आणले होते. भाविक वाजतगाजत मिरवणुकीने जाऊन देवभेट उरकत होते.

Web Title: In Jiju, a decrease in the number of devotees due to lunar eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.