‘जितो’चे तिसरे सुपर स्पेशालिटी कोविड सेंटर सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:23+5:302021-04-20T04:12:23+5:30
पुणे : जितो पुणेच्या वतीने डेक्कन भागातील हॉटेल अॅम्बेसिडर येथे सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ यांच्या ...
पुणे : जितो पुणेच्या वतीने डेक्कन भागातील हॉटेल अॅम्बेसिडर येथे सुपर स्पेशालिटी कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, पुणे शहर अध्यक्ष ओमप्रकाश रांका, लखीचंद खिवंसरा आदी उपस्थित होते.
..
या वेळी बोलताना मिसाळ म्हणाल्या, ‘‘जैन संघटनेचे पदाधिकारी नेहमी संकटकाळात मदत देण्याची भूमिका ठेवतात. म्हणूनच देव देणाऱ्या व्यक्तीला देत असतो. पैसे असो किंवा बुद्धिमत्ता असो, त्याचा आपण लोककल्याणासाठी वापर केला पाहिजे.’
ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर लागणार नाही, असे रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे होत आहेत. जितोने यापूर्वी स्पॅन एक्सिकेटिव्ह व भूषण हॉटेल येथे कोविड सेंटर सुरू केले असून, ती दोन्ही सेंटर रुग्णांनी पूर्ण भरली आहेत. अजूनही रुग्णांचा ओघ वाढत असल्याने हे तिसरे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय जितो पदाधिकाऱ्यांनी घेतला. या ठिकाणी सुमारे ५५ बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व रुग्णांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला पंकज कर्नावट, ॲड. अभय छाजेड, मनोज छाजेड, अशोक हिंगड, चेतन भंडारी,, रमेश गांधी, इंद्रकुमार छाजेड, आदेश खिवंसरा, हितेश शहा, सतीश हेरेकर, चेतन जैन, योगेश बाफना, अमित लोढा, गणेश कर्नावट, वैभव शहा, पराग दोशी, जयेश जैन, हर्षल ओसवाल आदींची उपस्थिती होती. या वेळी आदेश खिंवसरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ओमप्रकाश रांका म्हणाले ‘‘आलेला प्रत्येक पेशंट हा आपल्या परिवारातील सदस्य आहे. या पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करीत आहोत.’’
कोट -
विजय भंडारी यांनी सांगितले की, ‘या तिन्ही सेंटरच्या माधमातून सेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सेंटर ‘जितो जेबीएन टीम’ चालवत आहे. ’
फोटो - जितो कोविड