मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाjk जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:42+5:302021-03-22T04:11:42+5:30
वारजे माळवाडी येथील मायरा एनक्लेव्ह शिवगंगा सोसायटीमधील १७ वर्षांच्या मुलाचे २७ जानेवारी रोजी अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितली ...
वारजे माळवाडी येथील मायरा एनक्लेव्ह शिवगंगा सोसायटीमधील १७ वर्षांच्या मुलाचे २७ जानेवारी रोजी अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरोडा व वाहनचोरी पथक क्र. १ चे पोलीस नाईक धनंजय ताजणे व गणेश पाटोळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या गंभीर गुन्ह्यातील आरोपी दीपक भंडलकर लोहगाव येथील प्राइड आशियाना सोसायटीच्या समोरील मोकळ्या जागेत लपून बसला होता. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन अधिक तपासात त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबूल केले. गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी पथक क्रमांक एकच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस अंमलदार धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, श्रीकांत दगडे यांच्या पथकाने या आरोपीला शिताफीने अटक केली.