नोकरीच्या आमिषाने युवकांना गंडा, दौैंड येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:58 AM2017-12-01T02:58:39+5:302017-12-01T02:58:42+5:30
दौैंड परिसरातील युवकांना रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून काही युवकांची ८० लाखांची फसणूक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.
दौैंड : दौैंड परिसरातील युवकांना रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून काही युवकांची ८० लाखांची फसणूक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.
या संदर्भात इंदिरा जाधव (वय ४८, रा. भिगवण रोड, बारामती) यांनी दौैंड पोलिसांत फिर्याद दिली असून रेल्वे कामगार नागनाथ कांबळे (रा. सहयोग सोसायटी, शेतकरी फार्मजवळ, दौैंड) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नागनाथ कांबळे आणि माझे पती हरिदास जाधव यांची ओळख झाली.
यावेळी नागनाथ कांबळे म्हणाला, की मी रेल्वेत सर्व्हिसला असून माझ्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत ओळखी आहेत. त्यानुसार मी युवकांना २०१० पासून रेल्वेत कामाला लावत आहे. त्यानुसार माझ्या दोन्ही मुलाला नोकरीस लावतो, म्हणून त्याने आमिष दाखवले. त्यानुसार माझा मुलगा विजय जाधव याला तिकीट तपासणीस तर दुसरा मुलगा कुलदीप जाधव यास लोकोपायल म्हणून कामाला लावत आहे. त्यासाठी सुरुवातीला १० लाख रुपये दिले. १५ दिवसानंतर ६ लाख रुपये दिले. लवकरच तुमच्या मुलांना नियुक्तीचे पत्र मिळेल, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ६ लाखांची मागणी केली. आम्ही सोन्याचे दागिने मोडून आणि नातेवाईकांकडून असे ६ लाख रुपये जमा केले. त्यानंतर कामाला आज लावतो. उद्या लावतो असे सांगून वेळ मारून नेत असे. १ जून २०१७ रोजी माझे पती हरिदास जाधव यांचे निधन झाले. आमच्यावर दुखाचे सावट होते. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही कांबळे यांना भेटलो तेव्हा नोकरीविषयी विचारले असता ते म्हणाले तुमचे नोकरीचे काम होणार नाही. तुमचे पैैसे देणार नाही. असे सांगून दमदाटी केली. एकंदरीतच माझ्या नातेवाईकांसह दौैंडमधील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. हिरा साळुंके (८ लाख), चंद्रकांत पवार (८ लाख), देविदास जाधव (१६ लाख), नीलेश आघाडे (८ लाख), नयना गुरव (८ लाख), शालू देडे (१६ लाख) अशी ८० लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.