मेट्रोत नोकरी; आमिष दाखवून उकळले पैसे, फसवणूक करणाऱ्याचा जबर मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 05:29 PM2022-10-02T17:29:07+5:302022-10-02T17:29:17+5:30

अमिष दाखवून फसवणूक केल्याने पाच- सहा जणांनी चिडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार

Job in Metro Money extorted by baiting cheater beaten to death | मेट्रोत नोकरी; आमिष दाखवून उकळले पैसे, फसवणूक करणाऱ्याचा जबर मारहाणीत मृत्यू

मेट्रोत नोकरी; आमिष दाखवून उकळले पैसे, फसवणूक करणाऱ्याचा जबर मारहाणीत मृत्यू

Next

धायरी : मंत्रालयातील मेट्रो विभागात नोकरीस लावतो, तसेच अनेक महिलांना कर्ज मंजूर करून देतो, असे अमिष दाखवून फसवणूक केल्याने पाच- सहा जणांनी चिडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनिल राधाकिसन नलवडे (वय:५४ वर्षे, भैरोबानाला, फातिमानगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडली.

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट -३ पथकाने महेश शंकरराव धुमाळ (वय: ३२ वर्षे रा. मु.पो. पिंपळे खालसा, हिवरे कुभार, पदमावती वस्ती, ता. शिरुर, जि - पुणे)  शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय:३२ वर्षे, रा. मोहितेवाडी, पोस्टा-वडगाव, ता-मावळ, जि-पुणे)  शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय:५६ वर्षे, रा. दत्तदिप सोसा.गंगानगर,फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अक्षय पोपट आढाव (वय:२२ वर्षे, रा. सिरापुर, ता. पारनेर, जि.अहमदनगर) या चौघांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील नलवडे हा पूर्वी कॅम्प भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करत होता. त्यानंतर तो शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून झेरॉक्स मशीन दुरुस्ती करायला लागला. दरम्यान त्याने ओळखीच्या लोकांना मंत्रालयातील मेट्रो विभागात नोकरी लावतो असे आमिष दाखवून पैसे उकळायला सुरुवात केली. तसेच महिलांना कर्ज मंजूर करून देतो म्हणून अनेकांना गंडा घातला. त्यामुळे वर्ष - दीड वर्षापासून फसवणूक झालेले नागरिक त्याचा शोध घेत होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी सुनील हा नऱ्हे भागातील अभिनव कॉलेज परिसरात राहणाऱ्या वनिता समीप कुर्डेकर यांच्या घरी आल्याची माहिती फसवणुक झालेल्या महेश धुमाळ मिळाली.  त्याने ओळखीत असलेल्या शिवराज सिंह यासह इतर फसवणुक झालेल्या व्यक्तींना माहिती देऊन नऱ्हे येथील वनिता कुर्डेकर या महिलेच्या घरी येण्याबाबत सांगितले. 

त्यानंतर चार आरोपी व त्यांच्या इतर दोन साथीदार यांनी कुर्डेकर यांच्या घरात घुसून सुनिल नलावडे यास हात-पाय बांधुन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच बिल्डिंगच्या खाली ओढत आणून पार्किंगमध्ये पुन्हा त्यास बेदम मारहाण करून तो बेशुध्द पडल्याचे दिसताच सर्व आरोपी पळून गेले होते. आरोपींचा शोध घेताना वेगवेगळी पथके तयार करून तळेगाव दाभाडे, फुरसुंगी, सिरापुर, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे पाठवून, याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाईल व गुन्ह्यात वापर केलेली स्कोडा कार असा एकुण ५ लाख ९ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, यांनी दहा तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव हे करीत आहेत.

Web Title: Job in Metro Money extorted by baiting cheater beaten to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.