नोकरीचे आमिष; युवकांची फसवणूक
By admin | Published: April 1, 2017 12:05 AM2017-04-01T00:05:16+5:302017-04-01T00:05:16+5:30
सरकारी नोकरीत कामाला लावतो म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील दोघांची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची
राजेगाव : सरकारी नोकरीत कामाला लावतो म्हणून राजेगाव (ता. दौंड) येथील दोघांची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.
या प्रकरणी संतोष वामन देवरे (रा. गुणवडी, ता. बारामती) याला अटक केली असून बारामतीमध्ये देखील अनेकांना त्याने गंडा घातला असल्याचे बोलले जात आहे. कपिल सुरेश लोंढे (रा. राजेगाव) यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दि. २५ जुलै २०१६ रोजी राजेगाव येथे संतोष देवरे आला आणि त्याने तुम्हाला शासकीय नोकरीस लावतो. माझी शासकीय खात्यात ठिकठिकाणी ओळखी आहेत,असे कपिल लोंढे आणि त्याचा चुलतभाऊ गणेश मालोजी लोंढे यांना सांगितले. यावेळी दोघांनीही प्रत्येकी ५ लाख रुपये असे दोघांचे १० लाख रुपये दिले.
त्यानंतर २१ सप्टेंबर २०१६ रोजी दोघांकडून ४ लाख रुपये नेले. मात्र नोकरीला लावले नाही. राजेगावच्या दोन्ही युवकांनी सातत्याने नोकरीसंदर्भात त्याला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)