पुणे महापालिकेत नोकरीची संधी; कनिष्ठ अभियंत्याची ११३ पदे
By राजू हिंगे | Published: January 9, 2024 09:19 AM2024-01-09T09:19:28+5:302024-01-09T09:19:45+5:30
पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील
पुणे : महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ११३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यापैकी १३ पदे माजी सैनिक अनुशेष भरून काढण्यासाठी ठेवली आहेत. सर्व संवर्गासाठी १०० पदे असणार आहेत.
महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती उमेदवारांना महापालिकेच्या वेबसाइटवर १६ जानेवारीपासून उपलब्ध होतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
कनिष्ठ अभियंतासाठी ३ वर्षांची अनुभवाची अट ठेवली होती. याबाबत बऱ्याच दिवसांपासून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अट रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. अनुभवाची अट कमी करण्यात येऊन पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असण्याची अट ठेवली आहे. पदवी किंवा पदविका घेतलेल्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.