नोकरी विद्यार्थ्यांमागे आली पाहिजे

By admin | Published: January 11, 2017 03:47 AM2017-01-11T03:47:08+5:302017-01-11T03:47:08+5:30

मन, मेंदू आणि मनगट जेव्हा एकत्र येतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्किल डेव्हलपमेंट यशस्वी होऊ शकेल. तसेच, विद्यार्थ्यांनी नोकरीमागे पळू नये तर नोकरीने

Jobs should be followed by the students | नोकरी विद्यार्थ्यांमागे आली पाहिजे

नोकरी विद्यार्थ्यांमागे आली पाहिजे

Next

पुणे : मन, मेंदू आणि मनगट जेव्हा एकत्र येतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्किल डेव्हलपमेंट यशस्वी होऊ शकेल. तसेच, विद्यार्थ्यांनी नोकरीमागे पळू नये तर नोकरीने विद्यार्थ्यांमागे आले पाहिजे, असे प्रतिपादन सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे नागपुरात ७५ एकर परिसरात शैक्षणिक संकुल उभारले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन पार पडले, त्या प्रसंगी मुजुमदार  बोलत होते. कार्यक्रमाला सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. सिद्धार्थ विनायक काणे आदी उपस्थित होते.
सिम्बायोसिसची शाखा मध्य भारतात विशेषत: नागपुरात व्हावी, हे माझे स्वप्न आणि सिम्बायोसिसचा संकल्प होता. तो पूर्ण झाला, याचा मला विशेष आनंद  आहे, असेही मुजुमदार म्हणाले.
नागपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सिम्बायोसिस संस्थेकडून नागपूर येथील शैक्षणिक संकुलात २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना शुल्कातही १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर यांनी केली.

Web Title: Jobs should be followed by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.