उषा तांबे यांना जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:03 AM2018-08-09T05:03:07+5:302018-08-09T05:03:09+5:30

मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

Jogaale Memorial Award for Usha Tambe | उषा तांबे यांना जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

उषा तांबे यांना जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

Next

पुणे : मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवार, १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ. जोगळेकर यांच्या कन्या उज्ज्वला जोगळेकर, चिरंजीव पराग जोगळेकर, परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित राहणार असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
प्रा. उषा तांबे यांनी तीस वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या विविध महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. प्रा. तांबे यांची काँक्रीटचे किमयागार, कहाणी कोयनेची, परिघाबाहेर, काबुल ब्युटिफूल, सेतू बांधियला सागरी, रोमांचकारी रेल्वे ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मराठी बोलू कौतुके आणि दुसऱ्या पिढीचे आत्मकथन या पुस्तकांचे त्यांनी सहसंपादन केले आहे. ओपन हार्ट, प्रिझनर आॅफ तेहरान या पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. मुंबई मराठी साहित्य संघाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. प्रा. तांबे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष होत्या. वाङ्मय निर्मितीबरोबरच संस्थात्मक कार्यासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांना डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Web Title: Jogaale Memorial Award for Usha Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.