पुण्यातील डीपी रोडवर अतिक्रमण व बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:03 PM2022-04-20T18:03:24+5:302022-04-20T18:04:55+5:30

या भागातील अंदाजे दोनशे ते अडीचसे अतिक्रमनावर कारवाई करण्यात आलीय

joint action of encroachment and construction department on dp road in pune | पुण्यातील डीपी रोडवर अतिक्रमण व बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई

पुण्यातील डीपी रोडवर अतिक्रमण व बांधकाम विभागाची संयुक्त कारवाई

googlenewsNext

कोथरुड : एरंडवणे भागातील नदीपात्रालगत असलेल्या हॉटेल, घरे, मंगलकार्यालय यांच्यावर महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. प्रशासनाची ही मोठी कारवाई बुधवारी सकाळी ७ वाजता सुरू झाली होती. म्हात्रे पूल येथून ते राजाराम पूलापर्यंत ही कारवाई करण्यात आली.

या भागातील अंदाजे दोनशे ते अडीचसे अतिक्रमनावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ज्यांची घरे, दुकाने, हॉटेल तुटली आहेत अशा नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आलाय. कोरोनाचा काळात नोकऱ्या गेल्या त्यातच तरुणांनी, नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. त्यातून उदरनिर्वाह होईल अशी व्यवस्था केली मात्र आमच्या पदरात निराशाच आली आहे असे येथील तरुणांचे, व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागाचे उद्दिष्टे- 
१) नागरिकांना अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर फेरीवाले यांचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे.
२) फेरीवाला क्षेत्र व ना- फेरीवाला क्षेत्र घोषित करणे व फेरीवाल्यांचे ना- फेरीवाला क्षेत्रामधून फेरीवाला क्षेत्रामध्ये पुर्नवसन करणे.
३)  शहराची फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करणे.
३) पदपथ, रस्ते इ. वरील बेकायदेशीर अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाले यांचे अतिक्रमण काढणे.
४) दवाखाने, रेल्वे स्टेशन, शाळा, धार्मिक स्थळे, सरकारी कार्यालये तसेच सायलेंट झोन इ. परिसर फेरीवाले अतिक्रमण मुक्त ठेवणे.
५) उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप, सभा मंडप इ. उभारण्यासाठी परवानगी देणे आणि कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे.

Web Title: joint action of encroachment and construction department on dp road in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.