क्षयरोगाच्या निदानासाठी संयुक्त सक्रिय शोध मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:41+5:302020-12-03T04:21:41+5:30
बारामती: कोरोना साथरोगाच्या आपात्कालीन परिस्थितीमुळे क्षयरूग्ण, कुष्ठरोग रुग्णांना निदान व औषधोपचारा खाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षांच्या तुलनेत ...
बारामती: कोरोना साथरोगाच्या आपात्कालीन परिस्थितीमुळे क्षयरूग्ण, कुष्ठरोग रुग्णांना निदान व औषधोपचारा खाली आणण्याचे प्रमाण मागील अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे क्षयरूग्णांच्या तातडीने निदानासाठी व उपचारासाठी राज्य शासनाच्या वतीने नव्याने अभ्यिान सुरू करण्यात आले आहे.
१ डिसेंबर पासून संयुक्त सक्रिय क्षयरूग्ण शोध मोहिम व कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरूग्णांचा शोध घेणार आहेत. या संदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्याकडून विविध उपाययोजना सुचवल्या जात आहेत. रुग्ण औषध उपचार पासून वंचित राहिल्यास इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. परिसरातील सर्व क्षयरुग्ण व कृष्ट रुग्णांचा शोध घेऊन निदान निश्चिती नंतर औषध उपचार सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजातील कृष्ट रुग्ण व क्षय रुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार संपुर्ण राज्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत हो शोध अभियान राबविण्यात येणार आहे. या योजनेस जिल्हास्तर तालुकास्तर व शहर स्तरावर १ डिसेंबर पासून सुरूवात करण्यात आली आहे. उपचारापासून अद्याप वंचीत असणाºया क्षयग्रस्त रूग्णांचा शोध घेऊन त्यांना डॉट्स उपचार सुरू करणे तसेच कृष्ठरोगाच्या रूग्णांना तातडीने बहुविद औषधोपचाराखाली आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाचा कालावधी हा १ डिसेंबर ते १६ डिसेंबर आहे. त्यानंतर पुढील १५ दिवस संशयित रुग्णांच्या तपासण्या करून औषधोपचार सुरू करण्यात येणार आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी तसेच क्षयग्रस्त व कृष्ठरोग ग्रस्त रूग्णांपर्यंत प्रभावी उपचार पोहचवण्यासाठी बारामती पंचायत समितीच्या वतीने पुढाकार घेऊन प्रयत्न करण्यात येत आहेत. गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमण, विस्ताराधिकारी सुनील जगताप, क्षयरोग पर्यवेक्षक एम. एम. मोहिते, एस. के. येले पर्यवेक्षक एस. एन खान यांच्यासह तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक, सेविका आरोग्य सहाय्यक आशा स्वयंसेविका, व गटप्रवर्तक तालुका समुह समन्वयक प्रयत्न करत आहेत.
सद्यस्थितीमध्ये बारामती तालुक्यामध्ये हे रुग्ण नोंदवण्याचे प्रमाण हे पुणे जिल्ह्यामध्ये तिसºया क्रमांकाला आहे. मागील वर्षी २०१९ मध्ये बारामती तालुक्यामध्ये एकूण ६९८ रुग्ण नोंदविण्यात आले होते. त्यापैकी ५४० रुग्ण बरे झाले आहेत. तर या वर्षी २०२० मध्ये एकूण ३५० रुग्ण नोव्हेंबर अखेर नोंदवलेले आहेत. पैकी १४० रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत.कोणताही न्युनगंड न बाळगता आरोग्य कर्मचाºयांना सहकार्य करा. क्षयरोग आणि कृष्ठरोगाचे वेळेत निदान झाल्यास रूग्णांना उपचाराचा फायदा होतो.
- डॉ. मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी, बारामती पंचायत समिती
संपुर्ण बारामती तालुक्यात आरोग्य कर्मचाºयांच्या वतीने घरोघरी जाऊन या अभियानांतर्गत तपासणी व पहाणी करण्यात येणार आहे. क्षयग्रस्त व कृष्ठरोग ग्रस्त रूग्णांनी निदान झाल्यानंतर उपचारात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.
- एम. एम. मोहिते क्षयरोग पर्यवेक्षक, बारामती
-----------------------------
फोटो ओळी : बारामती पंचायत समिती येथे संयुक्त सक्रिय क्षयरूग्ण शोध
मोहिम व कृष्ठरोग शोध अभियान सुरू करण्यात आले.
०२१२२०२०-बारामती-१२