Pune Police | संदीप कर्णिक यांनी पोलीस सहआयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:33 IST2022-04-22T17:27:28+5:302022-04-22T17:33:53+5:30
पुणे : राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यात ...

Pune Police | संदीप कर्णिक यांनी पोलीस सहआयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
पुणे : राज्याच्या पोलीस विभागात मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यात पुणे शहराच्या पोलीस सहआयुक्त पदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. आज संदीप कर्णिक पोलीस सहआयुक्तपदाचा पदभार स्विकारला आहे.
कर्णिक हे यापूर्वी मुंबईच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून होते. तर पुण्याचे सहपोलीस आयुक्त असलेले रवींद्र शिसवे यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. पुणे पोलीस सहआयुक्तपदी निवड झालेले संदीप कर्णिक यांनी यापूर्वी देखील पुण्यात काम केले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते.