सांधेदुखीचा त्रास वाढलाय...ही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:15+5:302021-03-15T04:10:15+5:30

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे ...

Joint pain has increased ... take care of this! | सांधेदुखीचा त्रास वाढलाय...ही काळजी घ्या !

सांधेदुखीचा त्रास वाढलाय...ही काळजी घ्या !

googlenewsNext

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे गेलेला नाही. आज दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या रूग्णांना मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना संसंर्ग होऊन गेला आहे व ते कोरोना च्या लक्षणांमधून जरी बरे झाले असतील तरी, अथवा ज्या लोकांना कदाचित कोरोना व्हायरस चे निदान झाले नसेलही पण कोरोना ची लक्षणे येऊन गेली आहेत, अश्या रुग्णांना एक लक्षण बघायला मिळते आहे ते म्हणजे गुडघेदुखीचा त्रास. कंबरदुखी टाच दुखणे हाताची बोटं व मनगट दुखणे/ आखडणे थकवा येणे...थोडे जरी चालणे झाले तरी मांड्या व पायाची पोटरी दुखणे...अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

कोरोन विषाणू संसंर्ग नंतर...विषाणूजन्य सांधेदुखी Post Viral arthralgia or Arthritis होण्याचे प्रमाण वाढतेच. काही रुग्णांना सध्या थंडी ताप आल्यानंतर काही दिवसात सांधेदुखी ची लक्षणे दिसत आहेत. हे चिकनगुणिया आजाराची लक्षणे असू शकतात. डास चालल्यानंतर हा चिकनगुणिया व्हायरस आजार होतो. साधारणपणे 3 ते 5 दिवस ताप येणे... रक्त तपासणी मध्ये मलेरिया अथवा डेंग्यूची लागण नाही असे दिसून येते, त्यावेळी चिकनगुणिया साठीची विशेष तपासणी Ig G ,IgM, ELISA करणे आवश्यक होते.

ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग अथवा कोरोनाची लक्षणे येऊन गेलेली आहेत व ज्यांना पुर्वी सुद्धा सांधेदुखीचा त्रास होत होता व आता सांधेदुखी वाढलेली आहे अशा रूग्णांनी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरजेप्रमाणे हलके व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण लाॅकडाऊन च्या काळात घरातच बसून असल्यामुळे सांध्याचे व्यायाम होत नव्हते. आता लाॅकडाऊन उठवला गेला आहे. काही स्वतःची काळजी घेऊन व्यायाम करणे. चालणे सुरू केले पाहिजे. ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग होण्याआधी कोणताही सांधेदुखीचा/ टाच दुखी/मनगटाच्या हालचाली मधील बदल...हातांची बोटे कडक होणे... असा जर त्रास होत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. चिकनगुणिया आजार तर नाही ना हे पण तपासले पाहिजे. विनाकारण वैद्यकीय सल्ला न घेता वेदनाशामक औषधे घेणे टाळावे. बऱ्याच वेळा हा Post Viral Arthralgia चा त्रास काही ठराविक औषधे व व्यायाम व आराम घेऊनच बरा होतो. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या...फळांचा वापर, लिंबू सरबत... असा योग्य तो आहार करणे आवश्यक आहे. रोज ठराविक कालावधीमध्ये चालणे असेल...सांध्याची हालचाल वाढवणारे स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम असतील...ते करणे आवश्यक आहे. घरात बसून काम असल्यामुळे बऱ्याच जणांची शारीरिक हालचाल मंदावली आहे. परिणामी वजन वाढणे... हालचाल नसल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आहे. एकाच जागी जास्त कालावधीसाठी बसून ऑफिस काम केल्यामुळे कंबर/ मान दुखण्याचे प्रमाण वाढते आहे. कदाचित अजून पुढील चार-पाच महिने तरी आपल्याला लाॅकडाऊनचे नियम पाळणे गरजेचे आहे. घरामध्ये बसूनच कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे त्यातली त्या स्वतःच्या शरीराची हालचाल व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला व नियमित व्यायाम व सकस आहार गरजेचा आहे.

- डाॅ. सचिन नागापूरकर, अस्थिरोग तज्ज्ञ

Web Title: Joint pain has increased ... take care of this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.