पुण्यात विनोदातील ‘ राजा ’ चे होणार स्मारक  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:00 AM2019-04-02T06:00:00+5:302019-04-02T06:00:08+5:30

निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले...

jokes king statue in pune | पुण्यात विनोदातील ‘ राजा ’ चे होणार स्मारक  

पुण्यात विनोदातील ‘ राजा ’ चे होणार स्मारक  

Next
ठळक मुद्देकै. राजा गोसावी प्रतिष्ठानचा पुढाकारकलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार

- नम्रता फडणीस- 
पुणे : निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही राजा गोसावी नावाची जादू ओसरलेली नाही. आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू उमटविणा-या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन केल्या जाणार आहेत. कै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
    सौजन्याची ऐशीतैशी ,करायला गेलो एक ,लग्नाची बेडी, डार्लिंग डार्लिंग यांसारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ह्णएकच प्याला,भावबंधन,संशयकल्लोळह यांसारखी संगीत नाटके तसेच  अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा,लाखाची गोष्ट, हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले. आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी होतात. इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साता-यापासून दहा किलोमीटरवर असलेल्या लिंब या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे. लिंब मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. यास शासनाने हिरवा कंदिल दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी यांनी ह्यलोकमतह्णला दिली. 
    ते म्हणाले, या स्मारकात राजा गोसावी यांच्या नाटक , चित्रपटांचे स्वतंत्र कलादालन, त्यांच्या कलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. मात्र केवळ स्मारकापुरतेच याचे स्वरूप मर्यादित न ठेवता तरूण पिढीसाठी अभिनयाच्या कार्यशाळांवर अधिक प्रमाणात भर दिला जाणार आहे. जुन्या कलाकारांच्या अभिनयाचा अभ्यास नव्या पिढीने करावा हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे. पूर्वी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये विनोद हा विषय अभ्यासक्रमाला होता. राजा गोसावी यांची नाटके, चित्रपट आवर्जून पाहा असे सांगितले जायचे. हे स्वत: अभिनेते असरानी यांनी आम्हाला सांगितले होते. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय आज तरूण पिढीला पाहायला मिळत नाही. मात्र जुन्या कलाकारांची नावे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. राजा गोसावी यांचा सहजसुंदर अभिनय, त्यांची विनोदाची पद्धत कार्यशाळेमधून य शिकविली जाणार आहे. मेकअप, वेशभूषा आदी चित्रपटाशी निगडित विविध कलांचे ज्ञानही युवा पिढीला देणार आहोत. 

Web Title: jokes king statue in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.