प्रत्यक्षात घडला जॉली एल एल बी : अधिकाऱ्यानेच उभा केला तोतया आरोपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:20 IST2019-08-17T14:13:40+5:302019-08-17T14:20:13+5:30
जॉली एल एल बी चित्रपटात घडलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग पुण्यात घडला आहे.

प्रत्यक्षात घडला जॉली एल एल बी : अधिकाऱ्यानेच उभा केला तोतया आरोपी
पुणे :जॉली एल एल बी चित्रपटात घडलेल्या प्रसंगासारखाच प्रसंग पुण्यात घडला असून चक्क अधिकाऱ्यानेच खोटा आरोपी उभा केल्याचे समोर आले आहे. या तोतया आरोपीला न्यायाधीशांनी नाव विचारताच त्याने चक्क न्यायालयातून पळ काढला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दौंड येथी ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे सुरक्षा दलामध्ये काम करणारे उपनिरीक्षक लोंढे यांनी एका प्रकरणाचा तपास करत होते. तपास अधिकारी म्ह्णून त्यांनी एका व्यक्तीला आरोपी म्ह्णून कोर्टापुढे हजर केले. मात्र न्यायालयाने संबंधित व्यक्तीला नाव विचारले तेव्हा मात्र त्याने अचानक पळ काढला. या प्रकारामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने उपनिरीक्षक लोंढे यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.