पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 02:28 PM2023-09-29T14:28:43+5:302023-09-29T14:29:14+5:30

चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही

Journalists do not expect this from Maharashtra leaders Sharad Pawar took the news of Bawankule | पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

पत्रकारांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा नाही; शरद पवारांनी घेतला बावनकुळेंचा समाचार

googlenewsNext

बारामती: महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टिप्पणी करणे योग्य नाही. पत्रकारांनी महाराष्ट्रातील नेत्यांकडून अशी अपेक्षा केली नव्हती. चहा आणि ढाब्यावर जाण्यासारखं पत्रकारांचं महाराष्ट्रात चित्र नाही,' अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बावनकुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. शरद पवार यांनी शुक्रवारी (दि २९) त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पत्रकारांनी पवार यांच्याशी संवाद साधला. 

राज्यात सध्या मराठा आरक्षणाबाबतचे आंदोलन जोर धरत आहे. या आंदोलनावर प्रतिक्रिया देत शरद पवार म्हणाले की, 'मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी ते आंदोलन, उपोषण करत आहेत. राज्य सरकारने त्यांना शब्द दिलेला आहे की आम्ही त्यांचा प्रश्न सोडवू. तसंच ओबीसींना वाटतं की त्यांच्यातील आरक्षण इतर कोणी घेऊन नये, याचीही नोंद राज्य सरकारला घ्यावी लागेल. याबाबतही काही निर्णय घेऊ, असा विश्वास केंद्र सरकारने दिला आहे. मराठा समाजाला जी आश्वासनं दिली आहेत, त्यावर राज्य सरकार काय निर्णय घेतं हे ३०-३५ दिवसांत कळेल. त्यानंतर मार्ग निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. अन्यथा काय होईल हे आज सांगता येणार नसल्याचे पवार म्हणाले.

भाष्य करणं टाळलं 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन कुठला तरी व्देष मनात ठेऊन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. याबाबत शरद पवार यांना बारामती अॅग्रोवरील कारवाईबाबत प्रश्न विचारला. मात्र पवार यांनी मी त्यावर उत्तर देऊ इच्छित नाही, असं म्हणत भाष्य करणं टाळलं.

Web Title: Journalists do not expect this from Maharashtra leaders Sharad Pawar took the news of Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.