पत्रकारांना ‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स’ म्हणून घोषित करावे : राजेंद्र भिंताडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:26+5:302021-05-05T04:17:26+5:30

राज्यातील सर्वच पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपले बातम्या देण्याचे काम अविरत करत असून, त्यांच्यामुळेच लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये बसलेले ...

Journalists should be declared as 'Frontline Covid Warriors': Rajendra Bhintade | पत्रकारांना ‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स’ म्हणून घोषित करावे : राजेंद्र भिंताडे

पत्रकारांना ‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स’ म्हणून घोषित करावे : राजेंद्र भिंताडे

Next

राज्यातील सर्वच पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आपले बातम्या देण्याचे काम अविरत करत असून, त्यांच्यामुळेच लॉकडाऊनमुळे नागरिक घरामध्ये बसलेले असताना अधिकृत माहिती मिळत आहे. आज महाराष्ट्र राज्यातील जवळपास ५२ पत्रकारांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट सर्वच पत्रकारांना ‘फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित’ करण्याची मागणी जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी शासनाकडे केली आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून आपले वार्तांकनाचे काम करत आहेत. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य जनतेला आज टीव्ही, ऑनलाईन तसेच प्रिंट मीडियामुळे कोरोनाबाबतची तसेच इतर खरी व अधिकृत माहिती वाचायला, पाहायला मिळत आहे. त्यांच्यामुळेच नागरिकांना घरबसल्या सर्व माहिती मिळत आहे.

परंतु ह्या माहिती देण्याच्या नादात त्यांना कोरोना महामारीच्या काळात आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. अशा वेळी आजार बळावण्याची जास्त शक्यता असून प्रसंगी ज्येष्ठ तसेच इतर पत्रकारांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.

यामुळे राज्य सरकारने पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडच्या धर्तीवर राज्यातील सरसकट सर्व पत्रकारांना 'फ्रंटलाइन कोविड वॉरियर्स' म्हणून घोषित करावे आणि कोरोनाने एखाद्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यास ५० लाखांची मदत त्यांच्या कुटुंबीयांना करण्याची मागणीदेखील राजेंद्र भिंताडे यांनी केली आहे. दरम्यान, भिंताडे यांच्या मागणीला पत्रकार संरक्षण समितीने पाठिंबा दिल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Journalists should be declared as 'Frontline Covid Warriors': Rajendra Bhintade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.