पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 09:15 PM2023-11-18T21:15:45+5:302023-11-18T21:15:56+5:30

बारामतीत व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन.

Journalists should present the truth only - Sharad Pawar | पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

बारामती- पत्रकारीतेमध्ये आज अनेक नवीन आव्हाने आहेत. एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे. मात्र, पत्रकारांनी सत्य, योग्य असेल तेच मांडावे. कोणाच्या दमदाटीवरुन,सुचनेवरुन लेखणी चालवु नये,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती येथे आयोजित पत्रकारांच्या ‘व्हाइस आॅफ मिडीयाच्या राज्य शिखर अधिवेशनात ते बाेलत होते.यावेळी कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे,खासदार कुमार केतकर,ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार,जयश्री खाडीलकर,प्रकाश पोहरे,कुमार सप्तर्षी,माजी  मंत्री हर्षवर्धन पाटील,कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार आदी  उपसथित होते.

यावेळी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील सारस्वतांचा,वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या व्यक्तींचा  व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते  पवार, माजी केंद्रीय मंत्री  सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री पवार बोलत होते.

ते म्हणाले की, पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थीत राहिलो आहे.माझे महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडिलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले. नेता , काॅंग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणींना पवार यांनी उजाळा दिला.

माजी केंद्रीय मंत्र सुशीलकुमार शिंदे म्हणाले, गेल्या तीन - चार वर्षात देशाची सामाजिक परिस्थीती बिघडत आहे. त्यात सुधार करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

खासदार कुमार केतकर यांचे यावेळी भाषण झाले. जाती -पाती मध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहे. आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही.२०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतर पिक्चर मोठा राहणार असल्याचे केतकर म्हणाले.

संपुर्ण देशाचे चित्र समोर ठेवल्यास मोदींच्या नेतत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत. देशात ६० टक्केपेक्षा अधिक देशातील राज्य आज भाजपच्या हातात नाही. गोवा मध्ये तोडफोड झाली, महाराष्ट्र मध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली.यानंतर होणार्या निवडणुकीत लोक काय निर्णय घेतील,याबद्दल  बोलणे योग्य ठरणार  नाही.मात्र, देशातील बदल स्पष्ट दिसत आहे.या सगळ्या स`थितीत  लोकांची अस्वस`थता मांडण्यासाठी पत्रकारीता हे एकमेव माध्यम आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रमाणे पत्रकारीतेची आज खरी गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

दरवर्षी पंतप्रधान दिवाळी सण काश्मीरमध्ये जवानांबरोबर घालवतात,असे चित्र आपण पाहतो.  ६ वर्षापुर्वी पंतप्रधानमंत्र्यांनी काश्मीरला जाऊन काश्मीरचा चेहरा बदलणारे कार्यक्रम जाहीर केले.त्यानंतर ते ५ वर्ष  दिवाळीत काश्मीरला गेले.मात्र, दरवेळी जवानांबरोबर वेळ दिला.मात्र,काश्मीरच्या लोकांचे मुलभुत प्रश्नासाठी  जनतेसमोर कार्यक्रम मांडले,त्यातील एकाही कार्यक्रम कोणत्याही प्रकारे  सोडवणुक करण्यासाठी पाऊल टाकले नाही,असा अनुभव अनेक वेळचा आहे,याही दिवाळीचा सुध्दा तो आहे.त्यामुळे चित्र गंभीर असल्याची चिंता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Journalists should present the truth only - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.