पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:18 AM2017-11-28T04:18:27+5:302017-11-28T04:18:33+5:30

देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे.

 Journalists should work as a curb - Chandrakant Patil | पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करावे - चंद्रकांत पाटील

Next

पुणे : देशाच्या विकासामध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका योग्यपणे बजावली तर देशाच्या विकासास वेळ लागणार नाही. देशाच्या विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या घोडदौडीमध्ये पत्रकारांची भूमिका ममत्वाची असून पत्रकारांनी अंकुश म्हणून काम करणे आवश्यक आहे. तसेच या अंकुशाबरोबर भीती ही असलीच पाहिजे. मात्र, पत्रकारिता हे एक भयानक प्रकरण असल्याने सांभाळून आणि कमी बोला, अशी स्थिती निर्माण झाली तर ही चिंताजनक बाब असेल, असे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जर्नालिस्ट वृत्तवाहिनी स्टुडिओचे व पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरव करण्यात आला. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, गोविंद घोळवे, राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, अभिनेता राहुल सोलापूरकर, विश्वासराव आरोटे आदी उपस्थित होते.
‘लोकमत’चे औरंगाबाद आवृत्तीचे अनिल भापकर यांच्यासह प्रा. सी. एन. चौधरी, आशिष घुमे, सोमनाथ काळे, प्रा. आनंद सुराणा आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळात केवळ घडणाºया घटनांच्याच बातम्या दिल्या जातात. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांत पश्चिम महाराष्ट्रात ३ कार्यक्रम का घेतले? त्यांनी या भागातील निवडक संस्थांनाच भेटी का दिल्या? एखाद्या सदस्याने विधान परिषदेचा राजीनामा दिल्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर घेतली जाणारी निवडणूक एक ते दीड महिन्यातच का घेतली जात आहे? याचे कारण मीडियाने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. त्यामुळे पत्रकारांनी केवळ रोजच्या घडामोडींकडेच लक्ष न देता शोधपत्रकारिता करावी.’’
खांडेकर म्हणाले, ‘‘सध्या डिजिटल युगाचा काळ असून वेब चॅनलचे महत्त्व वाढताना दिसत आहे. अलीकडचा प्रेक्षकवर्ग डिजिटल माध्यमाकडे वळत चालला आहे. दूरसंचावर बातम्या पाहणाºया प्रेक्षकांचा विचार केला तर मोबाईलवर बातम्या पाहणाºयांची संख्या वाढत चालली आहे. तसेच ज्यांना दीर्घ काळ पत्रकारिता करायची आहे. त्यांनी स्वत:मध्ये बदल करून डिजिटल पद्धतीचा अवलंब करावा.’’
विजय बाविस्कर यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. संजय भोकरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. उमेश कुलकर्णी, नवनाथ जाधव, संदीप भटेवरा यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाºयांनी संयोजन केले.

राणे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीत

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, तोपर्यंत नारायण राणे हे दुसºया क्रमांकाचे मंत्री होऊ शकणार नाहीत, अशी टीका पतंगराव कदम यांनी केली. तसेच भारतीय जनता पक्षाने भाषण, आश्वासने आणि मीडिया या तिघांमुळे हे राज्य घेतले, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी याप्रसंगी केली.
त्याचप्रमाणे सत्ता येते जाते. परंतु, सत्तेत राहून आपण किती जणांना मदत करतो. त्यावर प्रत्येकाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले असून त्याचा अंगीकर केला पाहिजे, असेही कदम यांनी नमूद केले.

Web Title:  Journalists should work as a curb - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे