तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांचा उलगडणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:04 AM2018-04-30T04:04:57+5:302018-04-30T04:04:57+5:30
तत्त्वज्ञान विषयामध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातील ३७ तत्त्वज्ञानांचे अभ्यासक, विचारवंत यांच्या कार्याचा लेखाजोखा डीव्हीडीद्वारे मांडण्यात आला आहे.
पुणे : तत्त्वज्ञान विषयामध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातील ३७ तत्त्वज्ञानांचे अभ्यासक, विचारवंत यांच्या कार्याचा लेखाजोखा डीव्हीडीद्वारे मांडण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
विद्यापीठातील पुम्बाच्या सभागृहात ४ मे रोजी सकाळी ११ वाजता या डीव्हीडी प्रकाशन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सदानंद मोरे
आणि गौर विद्यापीठ मध्य प्रदेशच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रा. अंबिकादत्त शर्मा उपस्थित राहणार आहेत.
या वेळी प्रा. सुरजीत कौर चहाल, प्रा. लता छत्रे, डॉ. हेमा मोरे आणि प्रा. विद्युत भागवत विविध विषयांवर मतप्रदर्शन करणार आहेत.
यामध्ये पर्यावरणीय नैतिकता, आम्ही उंबरा ओलांडला,
भारतीय ज्ञानमीमांसा आणि महाराष्ट्रातील स्त्रीवादाचा ऐतिहासिक आढावा या विषयांचा अनुक्रमे समावेश आहे.
याशिवाय ‘सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडीज अॅन्ड फिलॉसॉफी’ या विभागाने तत्त्वज्ञान क्षेत्रातील २४ अभ्यासकांच्या कार्याविषयी मुलाखतींचे ध्वनिमुद्रण केले आहे.