भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:04+5:302021-06-06T04:09:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. ...

The journey of Indian Railways towards the environment | भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, सौरऊर्जेचा होणारा वापर, पाण्याची बचत व्हावी म्हणून कोच वॉशिंग प्लांट, तसेच जवळपास ५ हजारांहून अधिक डब्यांत वापर होत असलेले बायो टॉयलेट अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रेल्वे पर्यावरणपूरक बनत चालली आहे.

भारतीय रेल्वे २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०१४ पासून प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढविला आहे. ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामुळे डिझेल वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

मध्य रेल्वेत २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे.

बॉक्स १

वॉशिंग प्लांट :

रेल्वे डबे धुण्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्याची बचत व्हावी याकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी हे प्लांट सुरू केले. मध्य रेल्वेत तीन प्लांट आहे. पूर्वी एक डबा धुण्यासाठी १५०० लिटर पाणी वापरले जात हाेते. आता केवळ ३०० लिटर पाणी वापरले जाते. त्यामुळे वर्षाला जवळपास १.२८ कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे.

बॉक्स २ सौरऊर्जा :

रेल्वेने १०००हून अधिक स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. यातून सुमारे ११४ मेगावॅट सौर रुफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ होण्याची योजना आहे. २०२०- २१ पर्यत देशातील ८००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर, रेल्वे इमारती एलइडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.

कोट :

प्रदूषणाला आळा बसावा व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता भारतीय रेल्वे महत्त्वाची पावले उचलत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.

Web Title: The journey of Indian Railways towards the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.