जानूबाईदेवीची यात्रा उत्साहात

By Admin | Published: December 24, 2016 06:35 AM2016-12-24T06:35:55+5:302016-12-24T06:35:55+5:30

हडपसर-सासवड रस्त्यावरील, दिवे गावाजवळील पवारवाडी येथील प्रसिद्ध जानूबाईदेवीची दोन दिवस चालणारी यात्रा उत्साहात

Journey to Janubai Devi | जानूबाईदेवीची यात्रा उत्साहात

जानूबाईदेवीची यात्रा उत्साहात

googlenewsNext

गराडे : हडपसर-सासवड रस्त्यावरील, दिवे गावाजवळील पवारवाडी येथील प्रसिद्ध जानूबाईदेवीची दोन दिवस चालणारी यात्रा उत्साहात संपन्न झाली. जानूबाई यात्रेकरिता पुणे जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय निमित्ताने पसरलेल्या पवारवाडी ग्रामस्थांनी एकत्रित जमून आनंदाने यात्रा साजरी केली.
बुधवार दि. २१ डिसेंबर रोजी विविध धार्मिक समारंभ पार पडले. सकाळी ७ ते ८ वा. अभिषेक, देवतापूजन, सकाळी ८ ते १२ वा. भजन, १२ ते ३ गोपाळजेवण, दु. ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जानूबाईदेवीच्या पालखीची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात व लालभडक गुलालाच्या उधळणीत ग्रामप्रदक्षिणा घेत संपन्न झाली. मिरवणूक झाल्यानंतर महाआरती झाली. रात्री ९ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ढोल- लेझीम असा छबिना कार्यक्रम रंगला. ढोल- लेझिम स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना रोख बक्षिसे पवारवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली, अशी माहिती सुभाष पवार यांनी दिली.गुरुवार दि.२२ डिसेंबर रोजी जानूबाईदेवीचा जागर कार्यक्रम झाला. महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेते साधूआत्मा कासेगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाने जानूबाई यात्रेची सांगता झाली. पवारवाडी ग्रामस्थांच्या वतीने जानूबाई यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Journey to Janubai Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.