रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा पुण्यातला प्रवास पन्नास रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:26+5:302021-06-24T04:09:26+5:30
डमी स्टार 828 लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, काही रेल्वे स्थानकाचे ...
डमी स्टार 828
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, काही रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये केले आहे. मात्र, पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपये इतकेच आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात स्थानकावरील अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तो निर्णय आजही लागू आहे. पुणे स्थानकावर प्लेटफॉर्म तिकीट दर ५० रुपयेच आहे. या १४ महिन्यांच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीटाच्या विक्रीतून रेल्वेला ९४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले. यापूर्वी ते १० रुपये होते. थोड्या महिन्यांनंतर पुणे विभागात पुणेसह कोल्हापूर, सांगली, सातारा व मिरज स्थानकावर देखील १० रुपयांचे दर वाढवून ५० करण्यात आले. तसेच मुंबई विभागात देखील सात स्थानकांवरील तिकीट दर 50 करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते पुन्हा 10 रुपये करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना सोडायला येणाऱ्या व्यक्तीना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स 1
स्थानकावरून धावतात रोज 55 गाड्या :
लॉकडाऊनपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे 220 प्रवासी गाड्या धावत होत्या. आता प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत पुणे स्थानकावरून रोज सरासरी 55 प्रवासी गाड्या धावत आहे. यातून रोज सुमारे 40 हजार प्रवासी प्रवास करतात.
बॉक्स 2
तिकीट दर वाढले, पण स्थानकाची कमाई नाही :
प्लॅटफॉर्म तिकीट दर 50 रुपये करण्यात आले, तरीदेखील स्थानकाची कमाई झाली नाही. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे गाड्यांची कमी असणारी संख्या. शिवाय प्लॅटफॉर्म तिकीट हे सरसकट सर्वानाच उपलब्ध नव्हते. विशिष्ट कारणसाठी प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येत. यात प्रवासी जर गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती असतील तरच त्यांना सहायक म्हणून असणाऱ्या व्यक्तीला प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात आले.
बॉक्स 3
प्रवासी वाढले :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. आता कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्याने गाड्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. पुणे स्थानकावरून हावडा, गोरखपूर, दानापूर आदी गाड्यांना प्रवाशांचा जास्त प्रतिसाद आहे.
कोट :
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्लॅटफॉर्म वर येणाऱ्याची संख्या मर्यादित झाली. ज्या प्रवेशाना मदतनिसाची गरज आहे, त्यांनाच प्लॅटफॉर्म तिकीट दिले.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग.