उलगडला मंगळ मोहिमेचा प्रवास

By admin | Published: November 30, 2014 12:44 AM2014-11-30T00:44:55+5:302014-11-30T00:44:55+5:30

शनिवारी पुन्हा पुणोकरांसमोर उलगडली. इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांनी अगदी सोप्या भाषेत दृकश्रव्य माध्यमातून मंगळ मोहिमेचा थरार उपस्थितांसमोर मांडला.

Journey to Udalgad Mars Mission | उलगडला मंगळ मोहिमेचा प्रवास

उलगडला मंगळ मोहिमेचा प्रवास

Next
पुणो : अमेरिका, रशियासारख्या बलाढय़ देशांना मोहिमांना आलेले अपयश, त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांवरील वाढलेले दडपण आणि अपेक्षांचे ओङो, यशस्वी सुरुवातीनंतर प्रत्येक टप्प्यावर मिळत गेलेले यश आणि अखेर मंगळ ग्रहाच्या कक्षेत उपग्रहाने केलेला प्रवेश.. पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहिमेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रवासाची ही यशोगाथा शनिवारी पुन्हा पुणोकरांसमोर उलगडली. इस्रोचे माजी समूह संचालक सुरेश नाईक यांनी अगदी सोप्या भाषेत दृकश्रव्य माध्यमातून मंगळ मोहिमेचा थरार उपस्थितांसमोर मांडला. 
कोथरूड येथील महेश विद्यालयामध्ये आयोजित ‘सायन्स टॅलेन्ट हंट’ या उपक्रमांतर्गत शनिवारी नाईक यांचे ‘मंगळयान मोहिमेचा प्रवास’ या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी विद्यालयातील विद्याथ्र्यासह त्यांचे पालक, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. नाईक यांनी मंगळयान मोहिमेसह चांद्रयान 1 या मोहिमेची माहितीही उपस्थितांना दिली. दृकश्रव्य माध्यमातून मोहिमेतील प्रत्येक टप्प्याचे सविस्तर वर्णन करीत नाईक यांनी पृथ्वी ते मंगळ ग्रहार्पयतचा संपूर्ण प्रवास समोर उभा केला. त्यामुळे उपस्थितांची उत्सुकता ताणली जात होती. पीएसएलव्ही अग्निबाणाने केलेले उड्डाण आणि मंगळाच्या कक्षेत यान पोहचल्याचे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत भारतीय शास्त्रज्ञांच्या कामाला सलाम        केला. या वेळी बोलताना नाईक म्हणाले, जगभरात भारताला स्वातंत्र्यानंतर अत्युच्च स्थान प्राप्त करून देणारी घटना म्हणजे मंगळ मोहिमेला मिळालेले यश. अमेरिका, रशिया व युरापियन देशांनाही हे यश मिळालेले नाही. आतार्पयत 51 मोहिमा झाल्या आहेत. त्यातील केवळ 21 मोहिमांना यश मिळाले आहे. त्यातही पहिल्याच प्रयत्नात यश मिळविणारा भारत पहिला ठरला आहे. 
तंत्रज्ञानविषयक आव्हानांचे शास्त्रज्ञांवर दडपण होते. यावर मात करीत शास्त्रज्ञांनी अथक परिश्रमातून यश मिळविले. (प्रतिनिधी)
 
4इस्रोच्या वतीने पुढील काही वर्षात महत्त्वाच्या मोहिमा आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 2क्17मध्ये चांद्रयान  2 ही मोहीम आहे. या मोहिमेत रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाणार आहे. 
42क्2क्मध्ये पहिली भारतीय मानवी मोहीम करण्याचे इस्रोचे नियोजन आहे. या मोहिमेत दोन भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत; तर तिसरी सर्वात महत्त्वाची चांद्रयान 3 ही      मोहीम 2क्28मध्ये आखण्यात आली आहे. 
4या मोहिमेत भारत पहिल्यांदाच दोन अंतराळवीर चंद्रावर उतरविणार आहे, अशी माहिती सुरेश नाईक यांनी दिली.

 

Web Title: Journey to Udalgad Mars Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.