मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:30 PM2018-04-07T21:30:35+5:302018-04-07T21:30:35+5:30

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Judicial custody to Milind Ekbote | मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

मिलिंद एकबोटे यांना न्यायालयीन कोठडी

Next

पुणे : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केलेल्या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (वय ६१, रा. शिवाजीनगर) यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. शनिवारी एकबोटे यांना शिवाजीनगर न्यायालयातील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शिरूर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 
             बचाव पक्षातर्फे  अ‍ॅड. एस.के.जैन आणि अ‍ॅड. अमोल डांगे यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सोमवारी (दि. 9 एप्रिल) सुनावणी होणार आहे. १ जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिना निमित्ताने वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली होती. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी न्यायालयी परवानगी घेत एकबोटे यांना भादवी कलम ३०७ सह १२० (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ व ४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्‍ट कलम ७ अशा विविध कलमानुसार अटक केली होती. त्यानुसार त्यांची ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी एकबोटे यांना सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजीनगर न्यायालयात हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. 

Web Title: Judicial custody to Milind Ekbote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.