न्यायव्यवस्थेत सकारात्मकता हवी
By admin | Published: April 27, 2017 05:19 AM2017-04-27T05:19:20+5:302017-04-27T05:19:20+5:30
‘न्यायव्यवस्थेमध्ये सक्रियता आणायची असेल तर परखड प्रश्न विचारत न्यायालयाच्या निकालांचा अन्वयार्थ काढणाऱ्या वकिलांची
पुणे : ‘न्यायव्यवस्थेमध्ये सक्रियता आणायची असेल तर परखड प्रश्न विचारत न्यायालयाच्या निकालांचा अन्वयार्थ काढणाऱ्या वकिलांची आणि नागरिकांची गरज आहे. न्यायव्यवस्थेमध्ये कृतिशीलता, सक्रियता आणि सकारात्मकता असली पाहिजे. राज्यसत्तेचे चेहरे हिंसक होत असताना विवेकाचा विचार जिवंत ठेवण्याची न्यायालयाची जबाबदारी वाढली आहे. रचनात्मक सामाजिक निर्णय व्हायचे असतील, तर नागरिकांचाही यामध्ये सहभाग असावा, असे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
कमोडोर मधुकर केशव लेले स्मृतिव्याख्यान या उपक्रमांतर्गत अॅड. सरोदे यांनी ‘न्यायालयीन सक्रियता : काल आणि आज’ यावर ते बोलत होते. या वेळी डॉ. वि. वि. घाणेकर, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
सरोदे म्हणाले, ‘‘सध्या छुप्या पद्धतीने मूलभूत हक्कांच्या नरड्याला हात घातला जात आहे. धोरणात्मक निर्णयांमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही. परंतु, सामान्यांचे हाल होत असतील तर न्यायालय सक्रिय होत आहे. न्यायालयीन सक्रियता जनतेने व्यापकतेने स्वीकारायला हवी.’’ (प्रतिनिधी)