लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 10:43 AM2023-11-06T10:43:19+5:302023-11-06T10:44:45+5:30

डॉ. सागर गणपतराव बालवाडकर प्रस्तुत सदर कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि सरोद वादक अयान अली बंगश आणि युवा सरोद वादक अमान अली बंगश या भावंडांची सुरेल जुगलबंदी पाहायला मिळणार आहे....

Jugalbandi of 'Aman-Ayaan' will take place in Lokmat 'Swarchaitanya', Diwali Pahat in Balewadi | लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट

लोकमत ‘स्वरचैतन्य'मध्ये रंगणार ‘अमान-अयान’ची जुगलबंदी, बालेवाडीकरांसाठी दिवाळीची पहाट

पुणे :पुणेकरांची दिवाळी पहाट सुमधुर गायकीने व्हावी, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने शनिवारी 'लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट'चे आयोजन केले आहे. डॉ. सागर गणपतराव बालवाडकर प्रस्तुत सदर कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि सरोद वादक अयान अली बंगश आणि युवा सरोद वादक अमान अली बंगश या भावंडांची सुरेल जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. त्यांच्या सोबत पद्मश्री विजय घाटे आणि नॅशनल फिल्म अवॉर्डने सन्मानित राहुल देशपांडे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, एएनपी कॉर्प, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप, रांका ज्वेलर्स आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम हाेत आहे. बालेवाडी येथील सी.एम. इंटरनॅशनल स्कूल मैदानात शनिवारी (दि. ११) पहाटे ५:३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठीचे पास खालील ठिकाणी मिळणार आहेत.

- अमान अली बंगश हे ज्येष्ठ सरोद वादक अमजद अली खान यांचे ज्येष्ठ पुत्र आणि शिष्य आहेत. सरोद वादनाच्या कलेत त्यांना त्यांच्या वडिलांनी दीक्षा दिली आणि वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिला सार्वजनिक कार्यक्रम केला होता. त्यांनी संगीतप्रेमींमध्ये स्वतःसाठी एक विशेष स्थान प्राप्त केले आहे.

- सरोद वादक अयान अली बंगश हे त्यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांनी संगीताचा नामांकित शो 'सारेगामा'मध्येही त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. स्वतःच्या अल्बमसोबतच त्यांनी वडील आणि मोठ्या भावासोबत अनेक कार्यक्रमांत जुगलबंदी केली आहे. सरोद वादक भावंडं आणि राष्ट्रीय संगीतकार विजय घाटे व राहुल देशपांडे यांच्या उपस्थितीने दिवाळीची पहाट नक्कीच स्वरमयी ठरणार आहे.

कुठे? : सी.एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, बालेवाडी

कधी ? : शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३

केव्हा : पहाटे ५:३० वाजता

प्रवेश पास मिळण्याची ठिकाणे

- एस.के.पी. कॅम्पस : सी.एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, बालेवाडी

- रांका ज्वेलर्स : आस्ट्रिक्स प्लाझा, डेरॉन हाइट्स, बाणेर

- लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड : विधाते टॉवर, औंध • माय वर्ल्ड सोसायटी, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर.

‘लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट’ कार्यक्रमात सरोद वादक अमन अली बंगश आणि अयान अली बंगश यांची साथ देण्यासाठी पद्मश्री विजय घाटे आणि राहुल देशपांडे हे स्वत: उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात नक्कीच सप्तसुरांचा आविष्कार पाहायला मिळेल. यांच्या अद्वितीय स्वरांच्या सादरीकरणातून बालेवाडीकरांची दिवाळी पहाट चैतन्याची ठरेल.

- डॉ. सागर गणपतराव बालवाडकर

Web Title: Jugalbandi of 'Aman-Ayaan' will take place in Lokmat 'Swarchaitanya', Diwali Pahat in Balewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.