रक्षाबंधन सणामुळे जुई-मोगऱ्याचे भाव दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:54+5:302021-08-23T04:12:54+5:30
मार्केट यार्डातील फुलबाजारात रविवारी विशेषत: झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. मात्र, मंदिरे अद्याप बंद असल्याने फुलांच्या अपेक्षित मागणीत वाढ ...
मार्केट यार्डातील फुलबाजारात रविवारी विशेषत: झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. मात्र, मंदिरे अद्याप बंद असल्याने फुलांच्या अपेक्षित मागणीत वाढ झालेली नाही. मोगरा आणि जुई या फुलांव्यतिरीक्त इतर शेवंती, गुलछडी, अष्ठर, गुलाब, झेंडू आदी फुलांचे दर त्यामुळे स्थिर आहेत, असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : जुई १०००-१२००, मोगरा २५०-३५०, झेंडू : २०-४०, गुलछडी : ५०-१००, अष्टर : जुडी ८-१२, सुट्टा ५०-८०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१३०, जर्बेरा : ८०-१२०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-११००, ऑर्चिड ४००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-८०.