‘जम्बो’ रुग्णालयाची क्षमता आणखी वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:13 AM2021-03-23T04:13:03+5:302021-03-23T04:13:03+5:30

पुणे : शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले असून येत्या आठवड्याभरात जम्बोची क्षमता ...

‘Jumbo’ will further enhance the capacity of the hospital | ‘जम्बो’ रुग्णालयाची क्षमता आणखी वाढविणार

‘जम्बो’ रुग्णालयाची क्षमता आणखी वाढविणार

Next

पुणे : शहरातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू केले असून येत्या आठवड्याभरात जम्बोची क्षमता ५०० खाटांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ यांच्यासह आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी जम्बो रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आठशे बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने १५ जानेवारी २०२१ रोजी जम्बो बंद करण्यात आले होते. आवश्यकतेनुसार जम्बो पुन्हा सुरू करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली होती. सोमवारी प्राथमिक स्वरुपात तातडीने जवळपास ५५ खाटा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये २५ आॅक्सिजन बेड, २५ अलगीकरण बेड व ५ आयसीयू बेड सुरू करण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात एकूण ५०० खाटांची सुविधा निर्माण केली जाणार आहे. यामध्ये २५० आॅक्सिजन, २०० सीसीसी व ५० आयसीयू खाटा असणार आहेत. यामधील येत्या बुधवारी (२४ मार्च) १०० आॅक्सिजन, ७५ सीसीसी व २० आयसीयू खाटा तयार केल्या जाणार आहेत. तर शुक्रवारी (२५ मार्च) १२५ आॅक्सिजन, १०० सीसीसी व २५ आयसीयूची तयारी केली जाणार आहे.

Web Title: ‘Jumbo’ will further enhance the capacity of the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.