उड्या मारत उदमांजर परतले पुन्हा हक्काच्या घरी, पाहा व्हिडीओ
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: October 3, 2022 06:05 PM2022-10-03T18:05:04+5:302022-10-03T18:06:36+5:30
उदमांजर आता चांगल्याप्रकारे आपले आयुष्य जगू शकणार....
पुणे : हिंजेवाडी फेज २ मध्ये एका कंपनी परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्मिळ प्रजातीचे उदमांजर आढळून येत होते. तेथील कर्मचाऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधला आणि त्या उदमांजराला निसर्गात सोडण्यात आले. त्यामुळे ते उदमांजर आता चांगल्याप्रकारे आपले आयुष्य जगू शकणार आहे.
वनरक्षक पांडुरंग कोपणार यांनी इतर वनकर्मचारी यांचासह जागेवर जाऊन उदमांजरास सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वनपरिक्षेत्र कार्यालयात दाखल केले, असता उदमांजराची प्राथमिक तपासणी केली. मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत उदमांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वनपाल संजय अहिरराव, मल्लिनाथ हिरेमठ, कल्याणी मच्चा तसेच वनरक्षक व वनकर्मचारी उपस्थित होते.
उदमांजर मिश्राहारी असून फळे, फुले याबरोबर खेकडी, मासे, उंदीर, बेडूक, किडे पाली खातो. सरोवरे ,तलाव, नद्या, कालवे इत्यादीच्या काठावर जमिनीत बिळ करून राहतो.
उड्या मारत उदमांजर पुन्हा हक्काच्या घरी#pune#asainpalmcivetpic.twitter.com/w5JPBAP32N
— Lokmat (@lokmat) October 3, 2022
उदमांजर या प्राण्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षण प्राप्त असून शेड्युल २ मधील पार्ट २ मध्ये समाविष्ठ आहे. या प्राण्याची छेडछाड करणे, जवळ बाळगणे, तस्करी करणे , शिकार करणे हा अपराध असून त्यास ३ ते ७ वर्षे पर्यंत कारावास तसेच २५ हजार रूपये पर्यंत दंड होऊ शकतो. वन्यजीवांशी संबंधित कोणतीही घटना आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा तसेच १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.