आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:43 AM2022-07-14T10:43:30+5:302022-07-14T10:44:49+5:30

आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला...

Junapool on Indrayani closed for traffic on the backdrop of Mahapura in Alandi | आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद

आळंदीत महापुराच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीवरील जुनापूल वाहतुकीसाठी बंद

googlenewsNext

आळंदी : मागील सहा दिवसांपासून इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदीची दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. तर मागील तीन दिवसांपासून नदीवरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला असून भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात गेले आहे. अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. यापार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१३) आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केला आहे.

पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र बुधवारी सायंकाळी चारनंतर ही पाणीपातळी अधिकच वाढली असून प्रवाहाच्या गतीतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलावर बसवलेले लोखंडी संरक्षण कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढत असल्याने इंद्रायणीची पाणी पातळी रात्रीच्या वेळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नदीवरील जुना पूल दळणवळणासाठी बंद करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याला बॅरिकेट लावून बंद करण्यात आले आहे.

या मार्गावरील वाहतूक लगतच्या नवीन पुलावरील रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दुहेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. तर इंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी घाट परिसरात आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून सूचना फलक लावले आहेत. पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापूराकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी२अंकुश जाधव व गोपनीय पोलीस अधिकारी मच्छिंद्र शेंडे यांनी केले आहे.

Read in English

Web Title: Junapool on Indrayani closed for traffic on the backdrop of Mahapura in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.