ज्येष्ठाला लुटणाऱ्या तरुणाला अटक
By admin | Published: January 9, 2017 03:28 AM2017-01-09T03:28:22+5:302017-01-09T03:28:22+5:30
स्वारगेट परिसरात ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी आणखी एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. अक्षय ऊर्फ अमोल बाळू घोरपडे
पुणे : स्वारगेट परिसरात ज्येष्ठाला लुटल्याप्रकरणी आणखी एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
अक्षय ऊर्फ अमोल बाळू घोरपडे (वय २०, रा. दांडेकर पूल) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी एकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मधुकर भगवान शिंदे (वय ७३, रा. धायरी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १८ नोव्हेंबर २०१६ रोजी स्वारगेट परिसरातील कॅनॉलजवळ घडली.
मधुकर शिंदे गावी जाण्यासाठी पीएमपीएल बसने आले होते. त्या वेळी ते लघुशंकेसाठी निघाले असताना एकाने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांच्याकडील दागिने, मोबाईल असा ७० हजारांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी नरेंद्र अवचिते याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासानंतर अक्षय ऊर्फ अमोल याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील वामन कोळी यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)