जुन्नरमध्ये दररोज ७५३ लोकांना मिळणार शिवभोजन थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:30+5:302021-04-18T04:09:30+5:30
ब्रेक द चेन योजनेंतर्गत येत्या एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचे निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. १५ एप्रिलपर्यंत तालुक्यातील ...
ब्रेक द चेन योजनेंतर्गत येत्या एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचे निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. १५ एप्रिलपर्यंत तालुक्यातील सात केंद्रांना ५०० शिवभोजन थाळीचे इष्टांक होते. परंतु सध्याचे कोरोनाचे वाढते संकट पहाता त्यात वाढ करण्यात येऊन ७५३ इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जुन्नर तालुक्यातील ७ केंद्रांवर रोज ७५३ नागरिकांना मोफत जेवण मिळणार आहे. या ७ केंद्रांमध्ये जुन्नर बसस्थानकाजवळील श्री शिवाजी आश्रम, रविवार पेठेतील हॉटेल गणराज, नारायणगाव बस स्थानकासमोरील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानप्रणित शिवभोजन थाळी, वारुळवाडी येथील ओम साई केटरिंग, आळेफाटा बसस्थानक परिसरातील हॉटेल गुरुकृपा, राजुरी येथील संकल्प अन्नपूर्णा केंद्र या सर्व ठिकाणी थाळीवाटप सुरू आहे. सकाळी ११ ते ३ या दरम्यान शिवभोजन थाळ्यांचे वाटप सुरू रहाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पुरवठा निरीक्षक जी.व्ही.ठाकरे यांनी सांगितले.