जुन्नरमध्ये महाआघाडीचा विचार नाही; स्वतंत्र लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:51+5:302021-07-16T04:09:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : राज्यातील महाआघाडीचा विचार न करता येत्या बाजार समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याची ...

Junnar has no idea of a grand alliance; Will fight independently | जुन्नरमध्ये महाआघाडीचा विचार नाही; स्वतंत्र लढणार

जुन्नरमध्ये महाआघाडीचा विचार नाही; स्वतंत्र लढणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : राज्यातील महाआघाडीचा विचार न करता येत्या बाजार समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात नारायणगाव येथे केली.

शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान कार्यक्रम नारायणगाव येथील जयहिंद पॅलेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, तालुका प्रमुख माउली खंडागळे, जि. प. सदस्य गुलाब पारखे, जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, उपजिल्हा प्रमुख शरद चौधरी, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, युवा सेना राज्य विस्तारक गणेश कवडे, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, शहर प्रमुख संतोष वाजगे, युवा सेना तालुका प्रमुख महेश शेळके, सह्याद्री भिसे, अभय वाव्हळ उपस्थित होते. सोनवणे म्हणाले, राज्यात महाआघाडी आहे. मात्र, विरोधक हे विकास कामाचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यात शिवसेनेतील मतभेद मिटवून पक्ष संघटना बळकट करण्यास प्राधान्य देणार आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी पुन्हा शिवसेनेत यावे, त्यांचे स्वागत केले जाईल असे आवाहन यावेळी सोनवणे यांनी केले.

माउली खंडागळे म्हणाले, पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत. शिवसैनिकांनी त्यादृष्टीने तयारीला लागावे. शिवसैनिकांनी सर्वसामन्याचे प्रश्न सोडवावेत आणि पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहान त्यांनी केले. सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले. सरपंच योगेश पाटे यांनी आभार मानले.

फोटो ओळ : शिवसेना संपर्क मेळाव्यात बोलतांना माजी आमदार शरद सोनवणे.

Web Title: Junnar has no idea of a grand alliance; Will fight independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.