जुन्नर नगरपालिकेच्या ‘ई-गव्हर्नन्स’चा शुभारंभ
By admin | Published: January 24, 2017 01:33 AM2017-01-24T01:33:33+5:302017-01-24T01:33:33+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या जयंतीच्या औचित्याने जुन्नर नगर परिषदेच्या वतीने ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत
जुन्नर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या जयंतीच्या औचित्याने जुन्नर नगर परिषदेच्या वतीने ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत आॅनलाइन पद्धतीने मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याच्या योजनेचा शुभारंभ नगराध्यक्ष शाम पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी उपनगराध्यक्षा
अलका फुलपगार, शिवसेना गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक समीर भगत, आविन फुलपगार, भाऊ कुंभार, फिरोज पठाण, अविनाश कर्डिले, नगरसेविका सुवर्णा बनकर, अंकिता गोसावी, हाजरा इनामदार, सना मन्सुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी नगरसेवक शाम खोत, गीतांजली डोके, मीरा पाद्रे, कुलदीप
वाव्हळ, माऊली होगे, विक्रम घोडेकर, मनोज शिंदे, आनंद कर्डिले, मनोज परदेशी,
बालाजी विजापुरे, वैभव मलठणकर,
राजू कर्पे, बाळू गाजरे, एजाज सय्यद, अभिजित शेटे, पल्लवी हराळ, राजू जुंद्रे, बाळू सोनावणे, मंगेश साळवे व शिवसैनिक या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)