४५० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने जुन्नर तालुका हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:20+5:302021-03-31T04:10:20+5:30

कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जुन्नर तालुक्यात एकूण ७२०२ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामध्ये ६४६७ रुग्ण बरे झालेले आहेत . ...

Junnar taluka hotspot as 450 patients are positive | ४५० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने जुन्नर तालुका हॉटस्पॉट

४५० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने जुन्नर तालुका हॉटस्पॉट

Next

कोरोना प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून जुन्नर तालुक्यात एकूण ७२०२ रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामध्ये ६४६७ रुग्ण बरे झालेले आहेत . सध्या ४५० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून ते उपचार घेत आहेत . आजपर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर ३.६७ टक्के आहे. तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्णाची संख्या नारायणगाव शहरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून नारायणगावात १०११ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत , त्यापैकी सध्या या गावात ५० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत . एकूण २७ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे . वारूळवाडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून ३४८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत , त्यापैकी सध्या या गावात १९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. या गावात आठ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

Web Title: Junnar taluka hotspot as 450 patients are positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.