जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 02:13 AM2017-09-14T02:13:29+5:302017-09-14T02:13:47+5:30

महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे.

In Junnar, too, punjabi punjabi punjabi | जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई

जुन्नरमध्येही वाळुतस्करांना दणका, बेसुमार वाळुउपशावर अंकुश, महसुलची कारवाई

Next

 जुन्नर : महसूल विभागाची परवानगी घेऊन ठरवून दिलेल्या वाळूच्या साठ्यापेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याने वाळूउपशावर अंकुश आणला गेला. हा वाळू उपसा महसूलविभागाने तातडीने थांबवला आहे.
जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांनी हे आदेश दिले. शेतकºयाची नदीकाठची जमीन नदीपात्रात गेली आहे, जमिनीचे सपाटीकरण करायचे आहे अशा सबबी पुढे करून मर्यादेपेक्षा जास्त वाळु उपसा करत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. बोतार्डे येथे हा वाळुउपसा सुरू होता.
आदेश जुन्नर तालुक्यातील सुराळे, बोतार्डे येथे मीना नदीच्या कडेला खाजगी क्षेत्रात तसेच नदीपात्रात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाळु उपसा सुरू होता. उपशासाठी पोकलेन, बुलडोझर आदी यंत्रणा वापरण्यात येत होती.
यासंबधी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप उत्तर्डे यांनी समाज माध्यमातून या विषयी आवाज उठवला. त्यामुळे महसुल प्रशासनास कारवाई करणे भाग पडले. वाळुव्यावसायिकांकडे खनिकर्म विभाग पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधीकृत परवाना होता त्यामुळे वाळुउपसा निर्धोकपणे सुरू होता. मात्र त्यांनतर शासनाने निर्धारित केलेले क्षेत्र सोडून नदीपात्र तसेच इतर शेतकºयांच्या जागेतील वाळुउपसा सुरू झाला होता. तहसीलदारांनी या ठिकाणी भेट देऊन महसुल यंत्रणेला अहवाल देण्यास सांगितले होते.
बोतार्डे येथील शेतकरी बाळु वामन तलांडे यांच्या नावाने वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. निर्धारित १००० ब्रासपेक्षा जास्तीचा वाळुउपसा होत असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर वरिष्ठच्या आदेशाननंतर तहसीलदारांनी वाळूउपशाची ईटीएस यंत्रणेद्वारे पाहणी केली. शेतकºयाच्या जमिनीत वाळु उपशाची परवानगी असताना नदिपात्रात वाळु उपसा होत होता.

वाळुतस्करीवर सारेच गप्प
शेतक-याच्या नावावर वाळुउपसा करणा-या वाळुव्यावसायिकांचा गट असुन यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी आहेत. बोतार्डे येथे सुरू असलेल्या वाळु उपशाबाबत कुणीही उघडपणे बोलत नव्हते. वाळु वाहतुक करणाºया वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी संदीप उत्तर्डे यांनी केली आहे.
कारवाईने धाबे दणाणले
वाळुउपशाचा अधिकृत परवाना मिळविण्यासाठी महसूल विभागात धडपडणाºया वाळुव्यावसायिकांचे या कारवाईने धाबे दणाणले. वाळुउपसा नुकताच सुरू झाला असतानाच यासाठी लावलेले लाखो रुपये वसुल होण्यापूर्वीच कारवाईचा बडगा उगारला आहे.
 

Web Title: In Junnar, too, punjabi punjabi punjabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे