राष्ट्रवादीच्या वतीने जुन्नरला आंदोलन : तहसीलवर हल्लाबोल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:39 AM2017-12-01T02:39:02+5:302017-12-01T02:39:29+5:30
जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जुन्नर तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली
जुन्नर : जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाच्या धोरणाविरोधात जुन्नर तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरचे तहसीलदार किरण काकडे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, जुन्नरच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार, जुन्नर नगरपालिका गटनेते दिनेश दुबे, नगरसेवक भाऊसो कुंभार, फिरोज पठाण, नितीन गांधी, अक्षय मांडवे, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापाशेठ खोत, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे, जुन्नर शहर अध्यक्ष महेश शेटे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसो देवाडे, सुनील ढोबळे, अझीम तिरंदाज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधारी भाजपा-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवून जनतेची व शेतकºयांची फसवणूक केली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, महिला वर्ग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, ग्राहक अशा सर्वच घटकांमध्ये या शासनाबद्दल नाराजी आहे.
केंद्र सरकारच्या नोटाबंदी व जीएसटी निर्णयामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे महागाईने सामान्य जनता हवालदिल झाली आहे. म्हणूनच या राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी राज्यभर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे अतुल बेनके यांनी या वेळी बोलताना सांगितले.