जैवविविधता व वनसंपदा पर्यावरणाचा मुख्य गाभा जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - १】

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:18+5:302021-08-25T04:15:18+5:30

जुन्नरच्या सहयाद्रीमधील वनसंपदा : अधिवास समृद्धता खोडद : नैसर्गिक सौंदर्याने व विविधतेने सजलेला जुन्नर तालुका व सह्याद्री नेहमीच पर्यटक ...

Junnar's Prosperous Environment - मुख्य Part - 1 मुख्य | जैवविविधता व वनसंपदा पर्यावरणाचा मुख्य गाभा जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - १】

जैवविविधता व वनसंपदा पर्यावरणाचा मुख्य गाभा जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - १】

googlenewsNext

जुन्नरच्या सहयाद्रीमधील वनसंपदा : अधिवास समृद्धता

खोडद : नैसर्गिक सौंदर्याने व विविधतेने सजलेला जुन्नर तालुका व सह्याद्री नेहमीच पर्यटक व अभ्यासकांच्या पसंतीमध्ये अग्रस्थानी आहे. या तालुक्यात निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते केलेली उधळण अद्वितीय आहे. जैवविविधता व वनसंपदा पर्यावरणाचा मुख्य गाभा आहे. जुन्नर व सह्याद्रीमधील वनसंपदा ही एकप्रकारे नैसर्गिक देणगी असून हा अमूल्य असा ठेवा संवर्धन करणे गरजेचे आहे.

जुन्नर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो शिवनेरी. सोबतच आठवतो तो रौद्र कड्यांसाठी प्रसिध्द असलेला जीवधन व नाणेघाट, सातवाहन काळातील व्यापारी मार्ग व याच मार्गावर डोंगरकड्यांत कोरलेली बौद्ध भिक्खूंची साधना गृहे म्हणजेच बुद्ध लेणी समूह व आणखी भरपूर काही. पण यासोबतच सर्वसामान्यांना अनभिज्ञ असणारी अशी गोष्ट म्हणजे जुन्नर परिसरातील वनस्पती विविधता व जुन्नरचे वनशास्त्रीय महत्त्व. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपण्याची गरज आहे.

जुन्नरच्या पश्चिम घाटाच्या उत्तर भागात म्हणजेच सह्याद्रीच्या कडेवर जुन्नर परिसर आहे.पूर्व भागात जवळपास सपाटीचा प्रदेश साधारणतः समुद्रसपाटीपासून ६०० मीटर उंचीवर आहे तर पश्चिम भागातील डोंगर १२५० मीटर उंचीवर आहेत. मध्य भागात मध्यम उंचीचे डोंगर,खोल दऱ्या, उतारांवरील जंगलं,नद्या, पठारे, सडे व शेती आहे.

पूर्व पट्ट्यात सपाट पठारांसोबतच खुरटी गवताळ रानं व काटेरी सुक्ष वने आहेत. मधील भागात मध्यम उंचीच्या डोंगररांगा, शुष्क तसेच आद्र पान गळीची वने नदी पात्र, लागवडीखालील शेती आणि पश्चिमेकडे उंच डोंगररांग, उतारावरील व दरी मध्ये निम्न सदाहरित जंगलं, उंचावरील सडे (पठार) व देवराया असे सर्वसाधारण प्रमुख अधिवास आहेत.सोबतच पुष्पवती,मीना व कुकडी या नद्या व त्यावरील धरणांनी अधिवासांच्या विविधतेत भर घातलेली आहे.

पूर्व भागातील शुष्क ,काटेरी वने व खुरट्या गवताळ रानांमध्ये रानकांदा, दिपकाडी, माईनमूळ, भुईगेंद,हनुमान, बटाटा,शिंदल माकडी, भुईफोड,करटुले,अरबीयन काकडी,हिवर,खैर,सालई,धावडा,हिंगणबेट,अंजनवृक्ष,वाघाटीचे प्रकार,सोमवल्ली व बोरीचे विविध प्रकार प्रामुख्याने आढळतात. मधल्या भागात शिवनेरी, लेण्याद्री, ओतूर, चावंड व हडसर हा भाग येतो. यात शुष्क व आद्र पानगळीची वने आहेत. येथील प्रदेश प्रामुख्याने ऊस ,द्राक्ष व कांदा लावगडीखाली आहे.या परिसरात रानहळद,शतावरी,बाडमुख, शिवसुमन,अग्निशिखा, गुळवेल, वाघाटी, साग,सावर, धावडा,बिवला,पांगारा,करवंद,तिवस आणि इतर वनस्पतींचे प्रकार आढळतात."

जुन्नरचा पश्चिम भाग हा वनस्पती समृद्ध आहे. येथे आद्र पानगळीची व निम्न सदाहरित जंगलं, उंच सडे,दऱ्या व देवरयांचा आहे.यात कंदील पुष्प,दीपकाडी, पाचन कंद,आमरी, कैता, सोनकी,रानओवा,पंद,दवबिंदू, सीतेची आसवं, नेचे,गवतं, दशमुळे मंजिष्ठ इत्यादी वनस्पतींच्या विविध प्रजाती आढळतात तसेच वृक्षांमध्ये हिरडा जांभूळ,आंबा,करप, लोखंडी, सावर,अंजनी,कुडा,आदी वनस्पती विपुल प्रमाणात आढळतात.

"एखाद्या ठिकाणाची जैवविविधता त्या ठिकाणाच्या भौगोलिक स्थान,वातावरण व अधिवास यामधील विविधतेवर अवलंबून असते. घाटावर पडणारा तुफान पाऊस, ४- ५ महिने असणारी आर्द्रता व अनिर्बंध वारे इथे काहीसे सौम्य रुप धारण करतात. या सर्वांचा परिपाकातून जुन्नर तालुक्यात नैसर्गिक अधिवासांची विविधता व विपुलता निर्माण झाली आहे."

संजयकुमार रहांगडाले, वनस्पतिशास्त्र संशोधक, प्रा.अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय,ओतूर,

किल्ले शिवनेरीचा व रहांगडाले सरांचा फोटो पाठवला आहे.

Web Title: Junnar's Prosperous Environment - मुख्य Part - 1 मुख्य

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.