Pune: एफडीएच्या सूचनांचा नुसता भडिमार, कारवाई मात्र शून्यच

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 18, 2023 05:26 PM2023-09-18T17:26:26+5:302023-09-18T17:29:33+5:30

पुणे : पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) केवळ अन्नपदार्थ असे बनवा, तसे बनवा, याबाबत आवाहन करत आहे. ...

Just a bombardment of FDA instructions, but zero action | Pune: एफडीएच्या सूचनांचा नुसता भडिमार, कारवाई मात्र शून्यच

Pune: एफडीएच्या सूचनांचा नुसता भडिमार, कारवाई मात्र शून्यच

googlenewsNext

पुणे : पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) केवळ अन्नपदार्थ असे बनवा, तसे बनवा, याबाबत आवाहन करत आहे. परंतु, आतापर्यंत कारवाई मात्र एकही केलेली नाही. त्यामुळे, एफडीए ही अन्न व्यवसायाचे नियमन करणारी यंत्रणा आहे की, सल्लागार एजन्सी? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या गणेशाेत्सवाचा काळ असून, यानिमित्त मोठ्या प्रमाणात प्रसाद तसेच गोडधोड पदार्थ शहरात बनविले जातात. यामुळे गुजरातसारख्या राज्यातून भेसळयुक्त खवा माेठ्या प्रमाणात पुण्यात येताे. निकृष्ट दर्जाचे तेल वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात. मात्र, याबाबत एफडीए अनभिज्ञ आहे की, याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत आहे? अशी चर्चा सुरू आहे. सध्या अधिकारी यांनी तपासणी व खाद्यनमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न व्यावसायिकांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.

...या आहेत सूचना :

१) मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात वापरण्यायोग्य (युज बाय डेट) दिनांक टाकावा.

२) कच्चे अन्नपदार्थ व खवा हा परवानाधारक / नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा जेणेकरून आपल्याकडे त्यांची खरेदी बिले राहतील.

३) प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत प्राप्त परवाना / नोंदणी क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.

४) पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.

५) अन्नपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावेत.

६) कामगारांची त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्तबाबतची वैद्यकीय तपासणी करावी.

७) मिठाई तयार करताना केवळ फुडग्रेड खाद्यरंगाचा १०० पीपीएमच्या आतच वापर करावा.

८) बंगाली मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत.

९) माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे.

नागरिकांना सूचना :

१) मिठाई, दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ नोंदणीकृत व परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावेत.

२) मिठाई, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे.

३) खरेदी करताना यूज बाय डेट पाहूनच खरेदी करावी.

४) उघड्यावरील तसेच फेरीवाल्यांकडून मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये.

५) माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे तसेच त्यांची साठवणूक योग्य तापमानात (फ्रिजमध्ये) करावी.

६) बंगाली मिठाई आठ-दहा तासांच्या आत सेवन करावी.

७) मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये. खराब/चवीत फरक जाणवला तर मिठाई नष्ट करण्यात यावी.

गणेश मंडळासाठी सूचना :

गणेशोत्सवानिमित्त जे गणेश मंडळ प्रसाद तयार करून वाटप करणार आहेत तसेच वितरित करणार आहेत, अशा सर्व गणेश मंडळांना FOSCOS.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये फी भरून अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे नोंद करून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे.

येथे करा तक्रार :

व्यावसायिक व ग्राहकांना अधिक माहितीसाठी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (पुणे विभाग), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

Web Title: Just a bombardment of FDA instructions, but zero action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.