संजय राऊत यांना अडवूनच दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:19+5:302021-09-08T04:16:19+5:30
पुणे : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रथम शहराची हद्द जाणून घ्यावी़ खासदार संजय राऊत हे गणेशोत्सवात पुण्यात ...
पुणे : भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रथम शहराची हद्द जाणून घ्यावी़ खासदार संजय राऊत हे गणेशोत्सवात पुण्यात येणार आहेतच़ त्यावेळी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास, शिवसेना स्टाईलनेच राऊत यांचे स्वागत करण्यासाठी येणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करू, असा इशारा मंगळवारी शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़
शिवसेनेचे नेते खासदार राऊत यांनी नुकतेच, कोथळा बाहेर काढू असे विधान केले होते. या विरोधात शहर भाजपने पोलिसांकडे तक्रार करून त्यांना अटक करण्याची मागणी करत राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा मुळीक यांनी दिला होता. याला आज शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापािलकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे आदींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.