वीस दिवस पुरेल इतकेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:33+5:302021-04-30T04:14:33+5:30
तळेगाव ढमढेरे : भीमा नदीवरील विठ्ठलवाडी-सांगवी सांडस येथील बंधाऱ्यात फक्त वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे स्थानिक ...
तळेगाव ढमढेरे : भीमा नदीवरील विठ्ठलवाडी-सांगवी सांडस येथील बंधाऱ्यात फक्त वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी सोडून गावाबाहेरील नागरिकांना नवीन पाईप लाईन टाकून पाणी उपसण्यासाठी पाटबंधारे विभागाने मंजुरी देऊ नये. असा ठराव विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. अशी माहिती सरपंच शंकर धुळे व उपसरपंच महेंद्र गवारे यांनी दिली.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्यांचा शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय आहे. सध्या भीमा नदीवरील विठ्ठलवाडी-सांगवी सांडस या बंधाऱ्यात पाणीसाठा साधारण वीस दिवस पुरेल एवढाच असल्याने हे पाणी गावाला पिण्यासाठी व इतर वापरासाठी आवश्यक आहे. भविष्यकाळात पाण्याचा तुटवडा भासणार असल्याने श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी संपूर्ण गाव नदीकिनाऱ्यावरील गावातील असणारे कायमचे रहिवासी सोडून गावाबाहेरील नागरिकांना नवीन पाईप लाईन खोदाई करण्यासाठी तसेच पाणी उपसण्यासाठी संबंधित पाटबंधारे विभागाने मंजुरी देऊ नये. असा महत्त्वपूर्ण ठराव विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीने नुकताच मासिक सभेत सर्वानुमते मंजूर केला आहे.
भीमा नदीवरील विठ्ठलवाडी सांगवी सांडस बंधाऱ्याची क्षमता ९२ दशलक्ष फूट एवढी आहे. या बंधाऱ्यावर विठ्ठलवाडी व तळेगाव ढमढेरे हद्दीतील शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली येत आहे.त्यामुळे या बंधार्यावरून पाणी उपशाचे प्रमाणही जास्त असल्याने या बंधाऱ्यात सध्या पाणीसाठा अवघा वीस दिवस पुरेल एवढाच आहे.
--
२९ तळेगाव ढमढेरे बंधारा
फोटो ओळ :भीमा नदीवरील विठ्ठलवाडी सांगवी सांडस दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यातील शिल्लक पाणीसाठा)