जरा डोळे उघडून बघा तरी! ‘भरत’ एकांकिका स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
By श्रीकिशन काळे | Updated: October 16, 2023 19:08 IST2023-10-16T19:08:05+5:302023-10-16T19:08:38+5:30
‘उघडा डोळे बघा नीट’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजची परिस्थिती मांडली आहे...

जरा डोळे उघडून बघा तरी! ‘भरत’ एकांकिका स्पर्धेला जल्लोषात सुरुवात
पुणे : आज आपण डोळे बंद करून जगत असल्याचे दिसून येते. कारण समाजात खूप काही चालले आहे. पण बऱ्याच गोष्टींकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘उघडा डोळे बघा नीट’ या एकांकिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजची परिस्थिती मांडली आहे. निमित्त होते भरत करंडक एकांकिका स्पर्धेचे.
अखंडित १२९ वर्षांची कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेला सोमवारी (दि. १६) जल्लोषात सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘उघडा डोळे बघा नीट' या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला. तरूणाई ज्या करंडकाची आतुरतेने वाट पाहत असते, तो ‘भरत’ करंडक आता सुरू झाला आहे. स्पर्धेचे यंदाचे १७ वे वर्ष असून स्पर्धेत २७ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धा दि. १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी ५ ते ११ या वेळात भरत नाट्य मंदिरात होत आहे.
स्पर्धेची सुरुवात भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, विश्वस्त प्रदिप रत्नपारखी, प्रतिभा दाते, कार्यवाह, स्पर्धेचे संयोजक संजय डोळे, विश्वास पांगारकर यांच्या उपस्थितीत रंगमंचाचे पूजन करून करण्यात आली.