दारूबंदी नुसताच दिखावा
By Admin | Published: May 18, 2017 05:47 AM2017-05-18T05:47:58+5:302017-05-18T05:47:58+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने
- लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद झाली असली तरी हॉटेल, ढाब्यांवर छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अधिक पैसे घेऊन ग्राहकांची लूट करत अवैध दारू विक्री सुरु आहे. यामुळे शासनाच्या दारूबंदी हा नुसताच दिखावा आहे. नियम धाब्यावर बसवून दारूविक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गवरील व राज्यमार्गावरील परमिट रुम, बिअर बार, देशी दारुची व बिअरशॉपीची ३१ दुकाने उत्पादन शुल्क विभागाकडुन सील करण्यात आली. यात भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाड-पंढरपूर रोडवरील दोन बिअरबार व एक बिअर शॉपी अशी तीन, तर भोर कापूरव्होळरोड वरील दोन बिअरबार अशी पाच दुकाने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील एक वाईन शॉप १४ बिअरबार आणी ११ बिअर शॉपी अशी २६, तर एकूण ३१ दुकानांना सील लागले आहे. याला दीड महिना झाला. मात्र, महामार्गावर आणि राज्य मार्गावरील सर्वच हॉटेल, ढाब्यांवर सर्रासपणे देशी-विदेशी दारूची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे. .हे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्षा पाहणीत हे सत्य समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या दारू बंदीची घोषणा कागदावरच राहिली आहे. शिरवळ ते कोल्हापुरपर्यंत महामार्गावरील सर्वच दारूची दुकाने बार, शॉपी बंद झाल्याने कुठेच दारू मिळत नाही. त्यामुळे दारुच्या बाटलीला सोन्याची किंमत आली आहे.
- आत्तामात्र हॉटेल ढाबेवाले गुपचूप छुप्या पद्धतीने दारू विक्री करत आहे. शासनाच्या या कारवाईनंतर महाड-पंढरपूररोड वरील निगुडघर येथे अवैध देशी व हातभट्टी दारूवक्रिीला मोठ्या प्रमाणात उत आल्याचे चित्र पाहावयास मिळत असून, पोलीस याकडे काणाडोळा करीत आहेत.
जादा किमतीने सर्रास विक्री
महामार्गावरील दारूविक्री जरी बंद झाली असली, तरी हॉटेल, ढाब्यावर जादा किं मत देऊन दारूमिळत असून अनेक गाडीचालक शहरातील वाईन शॉपमध्ये दारू घेऊन गाडीत, तर अनेकजण हॉटेलात नेऊन पितात. त्यामुळे शासनाच्या महामार्गावरील दारु बंदीच्या निर्णयामुळ दारू पिणारे कमी झाले नसून अधिक पैसे घेऊन दारु विक्री जोरात सुरु आहे. दारु बंदीच्या निर्णयामुळे महसूल तर बुडालाच. मात्र, शासनाचा उद्देशही साध्य होताना दिसत नाही.
वॉईन शॉपवर कारवाई करण्याची मागणी
महामार्गावरील शिंदेवाडी ते शिरवळ पर्यत कुठेच दारु मिळत नसल्याने या ठिकाणचे सर्व तळीराम भोर शहरातील नवीआळी तील एका वॉईन शॉप मध्ये दारु खरेदीसाठी रांगा लागतात.सदरचा रस्ता रहदारीचा असल्याने दारु घेण्यास येणारे आपल्या वार चाकी च दोन चाकी गाड्या रस्त्यावरच लावत असल्याने सदरच्या वाईनशॉप समोर वाहातुकीची वारंवार कोंडी होते याकडे दुकान चालकाचे व पोलीसांचे दुर्लक्ष होत असुन वॉईनशॉपवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करित आहेत.