कडेपठार गणपूजा साध्या पद्धतीने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:49+5:302021-07-12T04:07:49+5:30
जेजुरीतील वाणी समाज, रामोशी समाज आणि पुजारी समाजातील मानकऱ्यांनी ह्या उत्सवाचे नियोजन केले होते. काल शनिवारी सकाळी ...
जेजुरीतील वाणी समाज, रामोशी समाज आणि पुजारी समाजातील मानकऱ्यांनी ह्या उत्सवाचे नियोजन केले होते. काल शनिवारी सकाळी व दुपारची महापूजा वाणी समाजातील निवडक लोकांच्या उपस्थितीत करण्यात आली. तर रात्री ९ वाजता रामोशी समाजाची मानाची पूजा उरकण्यात आली. यानंतर वाणी समाजाने मानाचा भंडारा वाहिला देवाचा छबिना, आरती गुरव समाज, छबिना वादन घडशी, वीर समाज व दिवटी बुधलीच्या उजेडात उत्सवमूर्तींना मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनंतर उत्सवमूर्ती मंदिरात पुन्हा आणण्यात आल्या. यानंतर भंडारा वाटप करण्यात आले.
गणपूजा कार्यक्रमाचे संयोजन कडेपठार ट्रस्टने केले होते.
जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर सुनील महाडिक यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.
गुरव समाजतर्फे चैतन्य सातभाई,सचिन सातभाई,निलेश बारभाई, घडशी समाज समीर मोरे,राजेंद्र मोरे,वीर समाज सतीश कदम,कोळी समाज हनुमंत लांगी,रामोशी समाज अशोक खोमणे,सुंदर खोमणे
वाणी समाज विठल सोनावणे,आशिष वासकर,नंदू महाजन,विनोद वीरकर
ग्रामस्थांतून सचिन खोमणे शैलेश राऊत आदी उपस्थित होते.
ट्रस्टचे वतीने विश्वस्त नितीन कदम,सचिव सदानंद बारभाई यांनी व्यवस्थापन व नियोजन केले.
गणपूजेनिमित्त मार्तंडभैरवाच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आले होते.