कडूसला पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:28+5:302021-05-16T04:09:28+5:30
खेड तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. परंतु, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या ...
खेड तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्याने पाण्याची टंचाई जाणवली नाही. परंतु, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी झालेल्या भरमसाठ उपशामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्याच्या कृत्रिम टंचाईने मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ व समाधानकारक पावसाने धरण पुरेपूर भरले होते. गावच्या भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने एप्रिल मध्यापर्यंत पाणी टंचाई जाणवली नाही. मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. परिसरातील जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे गावठाण व परिसरातील वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरणाच्या पायथ्याच्या विहिरीतून, साठलेल्या पाण्याचा, ग्रामपंचायतीने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. कुमंडला नदी कोरडी ठणठणीत पडल्याने गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडूस व गरजूंना व परिसरातील वाड्या-वस्त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनचे मार्गदर्शन आवश्यक आहे. विधनविहिरी खोदणे,गाळ काढणे, गावातील अन्य पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे. ह्यामुळे भर, उन्हाळ्यातही पावसाळ्यांपर्यत पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता कमी होईल असे वाटते.
---------------------------
कोट -१
पाणीपुरवठा टाकीत पाणी घेण्यासाठी भीमा नदीच्या पात्रातून पाईप लाईन टाकण्याचे काम चालू असून, नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याकरिता ग्रामपंचायतीचे तातडीचे प्रयत्न चालू आहेत.
- निवृत्ती नामदेव नेहेरे, सरपंच, ग्रामपंचायत कडूस.
--
कोट -२
मातीबंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाण्याचा साठ्यात वाढ होऊन शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. सेवाभावी उद्द्योजकाकडून मदतीसाठी संस्था प्रयत्न करीत आहे.
- दिलीप ढमाले चेअरमन. भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था कडू.
--
फोटो क्रमांक : १५कडूस पाणीटंचाईच्या झळा
फोटो ओळी : कडूस (ता. खेड) येथील छोट्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.