कळंबोली पुलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:21 AM2020-12-03T04:21:50+5:302020-12-03T04:21:50+5:30
वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी ...
वाहनचालकांचा
जीव मुठीत घेऊन प्रवास
दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी
वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे निरा नदीला महापूर आला.यामध्ये पुणे-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटून वाहून गेला आहे. यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अक्षरश: जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कठड्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
गेल्या महिन्यात इंदापूर तालुक्यात अक्षरश: ढगफुटी झाली होती. यात भर की काय म्हणून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग करण्यात आला.यामध्ये कळंब गावातील निरा नदीकाठच्या परिसरातील २००घरे पाण्यात गेली होती. अनेक कुटुंबांना स्थलांतर होण्याची वेळ आली होती.बी के बी एन रस्त्याची वाहतुकव्यवस्था ठप्प झाली होती.कळंबहुन कळंबोलीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहराकडे नियमित होणारी वाहतूक दोन दिवस बंद करण्यात आली होती.निरा नदीमधील पाण्याच्या कमालीच्या प्रवाहामुळे निरा नदीवरील लोखंडी संरक्षक कठडा अक्षरश: वाहून गेला आहे.
हा पूल वाहतुकीसाठी मुख्य मार्ग असल्याने या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी वाहने ये जा करीत असतात.वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाच्या पुलाच्या मार्गावरील लोखंडी संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी प्रवाशीवगार्तून होत आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलावरून संरक्षक कठडे नसल्याने अंथुर्णे येथील सहा जण तर त्यानंतर जंक्शन येथील एका युवकाचा बळी गेला आहे.शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी प्रवाश्यांची मागणी आहे.
————————————————
फोटो ओळी : निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
०२१२२०२०-बारामती-०४
——————————————
===Photopath===
021220\02pun_1_02122020_6.jpg
===Caption===
निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.